Chhatrapati Sambhajinagar Rozabagh case | अटकेचा कायदेशीर पेच अखेर सुटला; तरुणाच्या खूनप्रकरणी सहा आरोपींना ३१ पर्यंत पोलिस कोठडी

Chhatrapati Sambhajinagar Rozabagh case | न्यायालयात सकाळी ११ ते रात्री ११ वाजेपर्यंत मॅरेथॉन युक्तिवाद
Chhatrapati Sambhajinagar Rozabagh case
रात्री ११ वाजेनंतर आरोपींना न्यायालयातून पोलिस कोठडीत घेऊन जाताना पोलिस.
Published on
Updated on

छत्रपती संभाजीनगर - रोजाबाग परिसरातील २१ वर्षीय तरुणाच्या निघृण हत्या प्रकरणात गेल्या तीन दिवसांपासून अटकेच्या वैधतेवरून सुरू असलेला कायदेशीर पेच अखेर मंगळवारी (दि. २८) सुटला. न्यायालयात सकाळी ११ ते रात्री ११ वाजेपर्यंत तब्बल १२ तास चाललेल्या युक्तिवादानंतर प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी श्रीमती एन. आर. गोरले यांनी सहाही आरोपींना ३१ जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

Chhatrapati Sambhajinagar Rozabagh case
Chhatrapati Sambhajinagar Municipal veg thali controversy | हॉटेल, रेस्टॉरंटपेक्षाही मनपा सभेची व्हेज थाळी महाग

शाहीद नुरुद्दीन चारनिया (२३, रा. हिमायतबाग), शेख कदीर शेख रहिम ऊर्फ अमिज ऊर्फ माया (२३, रा. महेमुदपुरा), उबैदुर रहेमान पटेल (२३, रा. रोजेबाग), अविनाश अमोल भोसले ऊर्फ क्रिश बाबा (१८, रा. एन-१३ हडको), शेख राफे रईसुद्दीन (२०, रा. जयसिंगपुरा), अक्षय विजय शिरसाठ (२१, रा. हरिओमनगर, हसूल) अशी आरोपींची नावे आहेत.

चार दिवसांपूर्वी झालेल्या वादातून नासेर खान तारेख अहेमद (२१, रा. शहाबाजार) या तरुणाची चाकू, रॉड आणि दांड्यांनी हल्ला करून रविवारी (दि. २६) मध्यरात्री पावणेएक वाजेच्या सुमारास रोजाबाग भागात हत्या झाली. या हत्याप्रकरणातील आरोपींच्या कायदेशीर अटकेवरून रविवारी आणि सोमवारी न्यायालयात मोठ्या घडामोडी घडल्या होत्या. न्यायालयाने मुक्तता केल्यानंतर पोलिसांनी पुन्हा ताब्यात घेतलेल्या आरोपींना विधिसम्मत पद्धतीने अटक करण्यासाठी स्वतंत्र अर्ज दाखल केला होता. त्यावर मंगळवारी सकाळी ११ वाजेपासूनच न्यायालयात सुनावणीला सुरुवात झाली.

Chhatrapati Sambhajinagar Rozabagh case
Maratha Reservation Manoj Jarange | जरांगेच्या उन्हातील आंदोलनानंतर ९९३२ कुणबी प्रमाणपत्रे वाटप

या गंभीर प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही दिवसभर न्यायालयात ठाण मांडले होते. दोन्ही बाजूंनी कायद्याच्या विविध मुद्द्यांवर युक्तिवाद झाला. ही सुनावणी रात्री उशिरापर्यंत, तब्बल ११ वाजेपर्यंत चालली.

दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने पोलिसांचा युक्तिवाद ग्राह्य धरत सहाही आरोपींना ३१ जुलैपर्यंत पोलिस कोठडीत पाठविण्याचे आदेश दिले. रविवारी न्यायालयाने अटकेच्या प्रक्रियेवर आक्षेप घेत मुक्तता केल्यानंतर पोलिसांनी आरोपींना न्यायालयाबाहेरून पुन्हा ताब्यात घेतले होते. सोमवारी त्यांना न्यायालयीन कोठडी मिळाली होती. अखेर मंगळवारी पोलिसांनी रीतसर अर्ज केल्याने हा कायदेशीर तिढा सुटला. सरकारी वकील श्रीमती देशमुख यांनी पोलिसांची बाजू मांडली, तर आरोपींच्या वतीने अॅड. नीलेश घाणेकर, अॅड. कुलदीप कहाळेकर, अॅड. विश्वजीत ढाकणे, अॅड. करण तुपे आणि अॅड. अझहर पटेल यांनी काम पहिले.

हत्येतील शस्त्रे आणि दुचाकी जप्त करायची आहे

पोलिसांच्या वतीने बाजू मांडताना सदरचे हत्याकांड अत्यंत गंभीर स्वरूपाचे असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आले. या गुन्ह्यातील फरार आरोपी शहेबाज याला अजून अटक करायची आहे. तसेच आरोपींकडून हत्येत वापरलेले चाकू आणि दांडे जप्त करायचे आहेत. गुन्ह्यात वापरलेली दुचाकी, घटनेच्या वेळी आरोपींच्या अंगावर असलेले कपडे जप्त करणे आणि त्यांचे रक्ताचे नमुने घेण्यासाठी पोलिस कोठडी देण्याची मागणी केली होती. न्यायालयाच्या आदेशानंतर पोलिस निरीक्षक निर्मला परदेशी, मनोज शिंदे, उपनिरीक्षक भागवत मुठाळ, संजय राठोड यांनी आरोपीना पोलिस कोठडीत घेतले

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news