Chhatrapati Sambhajinagar Municipal veg thali controversy | हॉटेल, रेस्टॉरंटपेक्षाही मनपा सभेची व्हेज थाळी महाग

Chhatrapati Sambhajinagar Municipal veg thali controversy -सत्ताधाऱ्यांकडून जनतेच्या पैशांची उधळपट्टीचा सपाटा; प्रतिव्यक्ती जेवण ५९० रुपये, चहा ३८, तर नाश्ता ७० रुपये
Chhatrapati Sambhajinagar Municipal veg thali controversy
Chhatrapati Sambhajinagar Municipal veg thali controversy AI image
Published on
Updated on

छत्रपती संभाजीनगर - महापालिकेचा कारभार पारदर्शी, काटकसर, भ्रष्ट्राचारमुक्त करा, असे आदेश निवडणुकीच्या प्रचार सभेतच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला होता. मात्र त्यानंतरही सत्ताधाऱ्यांनी खर्चाला लगाम लावण्याऐवजी उधळपट्टीचा सपाटा सुरूच ठेवला आहे. शहरातील महागड्या हॉटेल्स, रेस्टॉरंटपेक्षाही जास्त दराची व्हेज थाळी महापालिकेच्या सभांना येणाऱ्या नगरसेवकांना वाढली जाणार आहे. तसा प्रस्ताव येत्या गुरुवारी (दि. ३०) होणाऱ्या स्थायी समिती सभेत मंजुरीस्तव येणार आहे.

Chhatrapati Sambhajinagar Municipal veg thali controversy
MCOCA action against reel makers |गुन्हेगारांचे रील्स बनविणारे आता मकोकाच्या गुन्ह्यात होणार सहआरोपी, ४० रील्सबाजांना सायबर ठाण्यात बोलावून झापले

त्यात कपभर चहा ३८ रुपयांमध्ये, तर ७० रुपयांना एक प्लेट नाष्टा व व्हेज थाळी ५९० रुपये दराचा समावेश आहे. महापालिकेची स्थायी समितीची सभा येत्या गुरुवारी महापालिकेची स्थायी समितीची सभा येत्या गुरुवारी ११ वाजेच्या वेळेऐवजी दुपारी ३ वाजता सभापती अनिल कर्मचाऱ्यांच्या उपचारावर झालेल्या खर्चाचा परतावा प्रस्ताव आहेत.

या विषयपत्रिकेतील ४५ क्रमांकाचा प्रस्ता सर्वांच्याच चर्चेत आहे. हा विषय मनपाच्या सर्वसाधारण स्थायी समिती सभा आणि इतर सभांसाठी येणाऱ्या सदस्यांच्या खानपान, चहा, नाष्टा व भोजन व्यवस्थेबाब आहे.

त्यानुसार दरपत्रक मागविण्यात आले असून, त्या चक्क नाश्ता (प्रतिप्लेट) ७० रुपये, चहा, कॉफी (प्रतिनग ३८ रुपये, एवढेच नव्हे तर सर्व प्रकारचे बिस्कि (प्रतिपाकीट) १८ रुपये, पाण्याची बॉटल (२०० मिल प्रतिनग ७ रुपये, भोजन व्यवस्था (त्यात आवश्यव मनुष्यबळासह व राऊंड टेबल-खुच्र्यांसह दोन भाज्या, डाळ साधा भात, चपात्या, पुऱ्या, गोड पदार्थ, पापड, सलाव लोणचे, पिण्याचे पाणी) प्रतिनग ५९० रुपये याचा समावेश आहे. वर्षभरासाठी ३५ लाख रुपयांच्या खर्चाची तरतूद केली जाणार असून मंजुरी दिली जाणार आहे.

Chhatrapati Sambhajinagar Municipal veg thali controversy
Warudkazi minor assault case |खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीचा १४ वर्षीय मुलावर अत्याचार, गुंड मामा-भाच्याविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल

अशीही काटकसर

मनपात सत्ता येताच काटकसरीकडे कानाडोळा करीत युतीच्या पदाधिकाऱ्यांनी उधळपट्टी सुरू आहे. उदघाटन, भूमिपूजनाच्या कार्यक्रमावर लाखो रुपये खर्च होत आहे. पदाधिकारी दालनाच्या नूतनीकरणाचा खर्च अद्याप समोर आलेला नाही. त्यात आता कपभर चहा ३८ रुपयांना, तर साधे व्हेज जेवणाची थाळी ५९० रुपयांना घेण्याचे नियोजन प्रशासनाने केले आहे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news