Digital Arrest : निवृत्त महिला बँक कर्मचारी ८ दिवस डिजिटल अरेस्ट ; १३ लाखांचा गंडा

टेरर फंडिंगचा आळ अन अटकेची भीती; शहरात सलग दुसरी घटना; एमआयडीसी सिडको पोलिसांत गुन्हा दाखल.
Digital Arrest
Digital Arrest : निवृत्त महिला बँक कर्मचारी ८ दिवस डिजिटल अरेस्ट ; १३ लाखांचा गंडाfile photo
Published on: 
Updated on: 

Retired Women Bank Employees 8 Days Digital Arrest; 13 lakhs scam

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : जिन्सी भागातील एका वृद्ध महिलेला तब्बल १४ दिवस डिजिटल अरेस्ट ठेऊन ३ कोटी रुपये उकळल्याचा प्रकार ताजा असतानाच उच्चभ्रू सिडको एन १ भागातील अशाच प्रकारे एका ६७ वर्षीय निवृत्त महिला बँक कर्मचाऱ्याला सायबर भामट्यांनी डाटा प्रोटेक्शन बोर्ड ऑफ इंडियामधून बोलत असल्याची बतावणी करून, तुमच्या आधार कार्डचा वापर करून उघडलेल्या खात्यातून टेरर फडिंग होत आहे अशी भीती दाखवून १३ लाख रुपये लुबाडल्याचे समोर आले आहे.

Digital Arrest
Retired Employees Pension : निवृत्त कर्मचाऱ्यांच्या पेन्शनची फेरनिश्चिती; हायकोर्टाचा आदेश

ही घटना २३ ते ३० सप्टेंबरदरम्यान घडली. याप्तकरणी एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात रविवारी (दि. ४) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शकुंतला (६७, रा. एन-१ सिइको) या २०११ मध्ये एका नामांकित बँकेतून सेवानिवृत्त झाल्या आहेत. त्यांनी नुकतेच त्यांचे एक घर विक्रीला काढले होते आणि त्याचे अॅडव्हान्स पैसे त्यांच्या एसबीआय बँकेच्या खात्यात जमा होते.

२३ सप्टेंबर रोजी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास त्यांच्या मोबाईलवर एका अनोळखी क्रमांकावरून व्हॉट्सअॅप कॉल आला. फोनवरील व्यक्तीने मी डाटा प्रोटेक्शन बोर्ड ऑफ इंडियामधून बोलत आहे, असे सांगून हिंदीत बोलण्यास सुरुवात केली. कुणीतरी तुमच्या आधार कार्डचा नंबर चोरून तुमच्या नावाने दुसरे खाते उघडले आहे आणि त्यातून टेरर फंडिंग व मनी लाँड्रिंग होत आहे, अशी भीती त्याने घातली.

Digital Arrest
Crime News : 'तुझ्याकडे ड्रग्ज आहेत' म्हणत अभियंत्याला चाकू दाखवून लुटले

तुम्ही आताच्या आता तक्रार केली नाही, तर दोन तासांत पोलिस हातकडी घेऊन येतील आणि तुम्हाला अरेस्ट करतील. हा नॅशनल लेव्हलचा विषय असून आतापर्यंत २६९ दहशतवाद्यांचे अकाउंट पकडले आहेत, त्यात तुमचा नंबर आहे, अशी धमकी त्याने दिली.

आरबीआय तपासाच्या नावे उकळले १३ लाख

या प्रकरणातून बाहेर पडायचे असेल तर तुमच्या खात्यातील सर्व पैसे आम्ही दिलेल्या खात्यात जमा करा, आरबीआय याची चौकशी करेल, असे भामट्याने सांगितले. या Crime यांनी त्यांच्या एसबीआय (टाऊन सेंटर) खात्यातून सततच्या धमक्यांमुळे प्रचंड घाबरलेल्या शकुंतला २९ सप्टेंबर रोजी ८ लाख रुपये भामट्याने दिलेल्या कोटक महिंद्रा बँकेच्या जहिराबाद येथील एका खात्यावर आरटीजीएस केले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी ३० सप्टेंबर रोजी त्यांनी आणखी ५ लाख रुपये जीएम सिमेंट अँड स्टील इंडस्ट्रीज जामखेडी, कर्नाटक या येस बँकेच्या खात्यात ट्रान्सफर केले.

दर दोन तासाला फोटो पाठवा

१३ लाख रुपये ट्रान्सफर केल्यानंतरही भामट्यांनी तुमची चौकशी सुरू आहे, दर दोन तासांनी तुम्ही कुठे आहात याचा फोटो पाठवा, असे सांगून पैशांची मागणी सुरूच ठेवली. त्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर शकुंतला यांनी पोलिसांत धाव घेतली. या प्रकरणाचा पुढील तपास एमआयडीसी सिडको आणि सायबर पोलिस करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news