Crime News : 'तुझ्याकडे ड्रग्ज आहेत' म्हणत अभियंत्याला चाकू दाखवून लुटले

आकाशवाणी चौकातील घटना; सिडकोपासून केला पाठलाग
Crime News
Crime News : 'तुझ्याकडे ड्रग्ज आहेत' म्हणत अभियंत्याला चाकू दाखवून लुटलेfile photo
Published on: 
Updated on: 

Engineer robbed at knifepoint after being accused of possessing drugs

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : 'तुझ्याकडे ड्रग्ज आहेत, तुझी तपासणी करायची आहे,' अशी बतावणी करत एका लुटारूने चाकूचा धाक दाखवून अभियंत्याला लुटले. सिडको चौकाजवळ लिफ्ट देण्याच्या बहाण्याने लुटण्याचा प्रयत्न फसल्यानंतर त्याने अभियंत्याचा पाठलाग करून आकाशवाणी चौकात त्याला गाठले. रविवारी (दि. ४) रात्री साडेबारा वाजता ही घटना घडली.

Crime News
Short Circuit : शॉर्टसर्किटमुळे ऊस जळून खाक; शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान

याप्रकरणी जवाहरनगर पोलिस ठाण्यात अज्ञात लुटारूविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. केतन बंडू शिंदे (३६, रा. इंद्रधनू अपार्टमेंट, सिडको महानगर-१, तिसगाव) हे लिंबेजळगाव येथील एका कंपनीत सीनियर इंजिनिअर म्हणून कार्यरत आहेत.

ते रिसोड (जि. वाशिम) येथून ३ ऑक्टोबर रोजी मध्यरात्री १२.०५ ट्रॅव्हल्सने शहरात परतल्यानंतर नाईक कॉलेजजवळ उतरले. तेथून सिडको बसस्थानकाकडे स्वतःची वाजता मोटारसायकल आणण्यासाठी पायी जात असताना दुचाकीवरून आलेल्या एका इसमाने त्यांना 'लिफ्ट पाहिजे का?' अशी विचारणा केली. मात्र, शिंदे यांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केले.

दुचाकी बंद पडताच गाठले

सिडको बसस्थानकावरून मोटारसायकल घेऊन शिंदे घरी जात असताना आकाशवाणी रोडवर त्यांची दुचाकी अचानक बंद पडली. त्याचवेळी नाईक कॉलेजजवळ भेटलेला इसम तेथे आला. त्याने शिंदे यांना दुचाकी बाजूला घेण्यास सांगितले. शिंदे यांनी रामा ग्लास दुकानासमोर दुचाकी उभी केली. यावेळी लुटारूने पोलिस असल्याची बतावणी करत शिंदे यांच्याकडे ड्रग्ज असल्याचा संशय व्यक्त केला आणि तपासणीच्या नावाखाली त्यांचे खिसे व बॅग तपासली. त्यात काहीही न सापडल्याने त्याने मोबाईल मागितला. शिंदे यांनी मोबाईल देण्यास नकार देताच त्याने चाकू काढून धमकावले.

Crime News
Theft in the house : बंद घरातून १७ तोळे सोने, २ किलो चांदी लंपास

स्ट्रीट क्राईम वाढले; पोलिसांची गस्त कुठे ?

शहरातील प्रमुख रस्त्यांवर रात्रीच्या वेळी गुन्हेगारांचा मुक्त वावर असल्याचे या घटनेवरून पुन्हा समोर आले आहे. आकाशवाणी चौकासारख्या वर्दळीच्या परिसरात घटना घडत असताना जवाहरनगर पोलिस ठाण्याच्या गस्तीवरील पोलिस नेमके कुठे होते, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

खात्यात ९५० रुपये; मोबाईल हिसकावला

चाकूचा धाक पाहून शिंदे यांनी मोबाईल दिला. लुटारूने पासवर्ड विचारून फोन-पेवरील बँक खात्याचा बॅलन्स तपासला. खात्यात केवळ ९५० रुपये असल्याचे दिसताच त्यान त्याने मोबाईल हिसकावून तेथून पळ काढला

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news