Ganeshotsav 2026 : संभाजीनगरात साकारला जाणार उज्जैन मंदिराचा देखावा

यंदा गणरायाच्या दर्शनासोबत महाकालाचा अनुभव, भस्म आरतीचेही नियोजन
Ganeshotsav 2026
Ganeshotsav 2026 : संभाजीनगरात साकारला जाणार उज्जैन मंदिराचा देखावाfile photo
Published on
Updated on

Replica of Ujjain temple to be created in Sambhajinagar

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : यंदाच्या गणेशोत्सवात केवळ गणरायाचे आगमनच नव्हे, तर भक्तांना एका अद्भुत धार्मिक आणि सांस्कृतिक प्रवासाचा अनुभव घेता येणार आहे. अष्टांगहृदय गणेश मंडळाचे संस्थापक अध्यक्ष मनोज वडगावकर यांच्या संकल्पनेतून यंदा उज्जैन येथील विश्वविख्यात श्री महाकालेश्वर मंदिराची भव्य प्रतिकृती साकारण्यात येत आहे.

Ganeshotsav 2026
सरकारी निर्णयांसाठी ७ हजार याचिका; प्रशासकीय दिरंगाईवर खंडपीठाचा दणका

गणेशोत्सवाच्या उत्साहात यंदा "गणपती बाप्पा मोरया" सोबत "जय श्री महाकाल" चा जयघोष घुमणार असून, छत्रपती संभाजीनगरातील नागरिकांना उज्जैनच्या महाकालचा देखावा पाहता येणार आहे. यात प्रवेशद्वार, पारंपरिक मंदिर स्थापत्यशैली, आकर्षक कोरीवकाम, विशाल स्तंभ, दिव्य प्रकाशयोजना आणि आध्यात्मिक वातावरणाच्या माध्यमातून हा देखावा साकारला जाणार आहे.

मंदिर परिसरात प्रवेश करताच भाविकांना राजेशाही, धार्मिक आणि प्राचीन भारतीय संस्कृतीचा संगम अनुभवायला मिळेल. एकाच ठिकाणी गणेशभक्ती, शिवभक्ती आणि भारतीय संस्कृतीचा अद्भुत संगम यामुळे यंदाचा देखावा भाविकांसाठीही विशेष आकर्षण ठरणार आहे. - केवळ देखावा नाही... तर भक्तीचा अनुभव ! मंडळाने यंदा केवळ आकर्षक सजावट करण्याऐवजी भाविकांना एक वेगळा अनुभव देण्याचा प्रयत्न केला आहे. "देखावा असा की डोळे थांबतील आणि वातावरण असे की मन महाकालाच्या चरणी नतमस्तक होईल! अशी संकल्पना यामागे असल्याचे मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

Ganeshotsav 2026
SIR : एसआयआरमध्ये एकही पात्र मतदार वगळू नये

विशेष भस्म आरतीचे नियोजन

यंदाच्या उत्सवाचे आणखी एक प्रमुख आकर्षण म्हणजे उज्जैनच्या श्री महाकालेश्वर मंदिरातील भस्म आरतीच्या लाभ संभाजीनगरवासीयांना देण्याचा मंडळाचा मानस आहे. अनेक भाविकांना उज्जैनला जाऊनसुद्धा भस्म आरतीमध्ये सहभागी होण्याची संधी मिळत नाही. त्यामुळे मंडळाच्या वतीने विशेष भस्म आरतीचे नियोजन सुरू आहे. पहाटेच्या मंगलमय वातावरणात महाकाल भक्तीचा एक अविस्मरणीय अनुभव घेता येणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news