SIR : एसआयआरमध्ये एकही पात्र मतदार वगळू नये

जिल्हाधिकारी गौडा यांचे निर्देश, प्रत्येकांना बाजू मांडण्यास संधी द्या
SIR
SIR : एसआयआरमध्ये एकही पात्र मतदार वगळू नयेfile photo
Published on
Updated on

Not a single eligible voter should be left out of the SIR

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) कार्यक्रमांतर्गत प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध झाल्या आहेत. आता त्यातील जुळवणी न झालेले, विसंगती अथवा तफावत असलेले मतदारांचा तपशील आढळल्यास संबंधित प्रत्येक मतदाराला आपली बाजू मांडण्यासाठी सुनावणीची संधी द्यावी. त्यासोबतच कोणताही पात्र मतदार मतदानाच्या हक्कापासून वंचित राहणार नाही, याची दक्षता घेण्याचे निर्देश बुधवारी आढावा बैठकीत जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी जिल्हा निवडणूक विभागाला दिले.

SIR
ST bus : स्मार्ट तिकीट व्यवस्थेसोबत कागदी व्यवस्था

यावेळी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त रणजीत पाटील, उपजिल्हा निवडणूक अधिकारी सविता चौधर, जिल्हा पुरवठा अधिकारी प्रवीण फुलारी, उपजिल्हाधिकारी रुपेश सिनगारे, नम्रता चाटे, डॉ. नीलेश अपार, उपविभागीय अधिकारी संतोष गोरड, नीलम बाफना, डॉ. व्यंकट राठोड, अरुण जहऱ्हाड यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

एसआयआरच्या सुनावणीच्या टप्प्याचे प्रशिक्षण बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयात झाले. यात डॉ. नीलेश अपार यांनी साधन व्यक्ती म्हणून प्रशिक्षण दिले. निवडणूक आयोगाच्या कार्यक्रमानुसार १ ऑक्टोबर २०२६ हा अर्हता दिनांक असून, मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी तसेच नाव, पत्ता, अन्य तपशिलातील दुरुस्तीसाठी ३१ ऑगस्ट ते ३० सप्टेंबर या कालावधीत दावे व हरकती दाखल करता येणार आहेत.

नवीन नावासाठी नमुना ६, नाव वगळणे अथवा समावेशास हरकत घेण्यासाठी नमुना ७, तर तपशीलात दुरुस्ती किंवा अद्ययावतीकरणासाठी नमुना ८ वापरता येईल. प्राप्त दावे-हरकतींची माहिती दर आठवड्याला मान्यताप्राप्त राजकीय पक्षांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे. नागरिकांनी प्रारूप मतदार यादीतील आपले नाव व तपशील तपासून पात्र असूनही नाव नसल्यास दावा दाखल करावा, तसेच अपात्र नोंद आढळल्यास हरकत नोंदवावी.

SIR
सरकारी निर्णयांसाठी ७ हजार याचिका; प्रशासकीय दिरंगाईवर खंडपीठाचा दणका

सुनावणीची नोटीस संबंधित मतदारांना बीएलओमार्फत घरी देण्यात येणार असून, सुनावणीवेळी आवश्यक कागदपत्रांची माहितीही देण्यात येणार आहे. प्रत्येक आक्षेपित मतदाराची सुनावणी घेऊन विहित प्रक्रिया पूर्ण करण्याच्या सूचनाही अधिकाऱ्यांना देण्यात आल्या. एकही पात्र मतदार मतदानापासून वंचित राहणार नाही, याची दक्षता एसआयआरच्या सुनावणीच्या टप्प्यात घेणे असे आदेशही त्यांनी दिले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news