घाटनांद्रात पेट्रोल पंपावर वाहनांच्या रांगा

आंतरराष्ट्रीय स्तरावर वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर इंधन तुटवड्याच्या अफवांनी ग्रामीण भागातही चिंता निर्माण केली आहे.
sambhajinagar news
घाटनांद्रात पेट्रोल पंपावर वाहनांच्या रांगाfile photo
Published on
Updated on

घाटनांद्रा, पुढारी वृत्तसेवा :

आंतरराष्ट्रीय स्तरावर वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर इंधन तुटवड्याच्या अफवांनी ग्रामीण भागातही चिंता निर्माण केली आहे. या युद्धजन्य परिस्थितीमुळे इंधन पुरवठा खंडित होणार असल्याच्या चर्चामुळे घाटनांद्रा येथे शनिवारी (दि. २८) रोजी पेट्रोल पंपांवर नागरिकांची एकच झुंबड उडाली.

sambhajinagar news
पंपांवर नो स्टॉकचे बोर्ड; पेट्रोल, गॅससाठी नागरिकांच्या रांगा

सकाळपासूनच शेतकरी व नागरिकांनी पेट्रोल-डिझेल भरण्यासाठी मोठी गर्दी केल्याने पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. काही ठिकाणी वाहतूक कोंडीची परिस्थितीही निर्माण झाली. अफवांमुळे घाबरलेल्या नागरिकांनी गरजेपेक्षा अधिक इंधन भरण्याचा प्रयत्न केल्याने पंपांवर तात्प-रता ताण निर्माण झाला.

sambhajinagar news
Sambhajinagar News : टंचाईच्या अफवेने जिल्हाभरात गोंधळ ; तालुक्यांत वाहनांच्या लांबच लांब रांगा

परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सिल्लोड ग्रामीण पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक रवींद्र ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली बंदोबस्त ठेवला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news