

Public outcry against love jihad
पैठण, पुढारी वृत्तसेवा: पैठण येथे घडलेल्या एका तरुणीच्या अप-हरणाच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर रविवारी (दि.१) सकल हिंदू समाजाच्या वतीने शांततापूर्ण जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.
या मोर्चाची सुरुवात रविवारी खंडोबा मंदिर येथून करण्यात आली. मोर्चामध्ये कीर्तनकार, प्रवचनकार, संत-महंत, बाल वारकरी, विद्यार्थी, पैठण शहरातील नागरिक तसेच तालुक्यातील ग्रामीण भागातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
मोर्चाचा समारोप छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ करण्यात आला. यावेळी वक्त्यांनी समाजातील मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न, पालकांनी घ्यावयाची काळजी, तसेच तरुणांमध्ये जागरूकता निर्माण करण्याची गरज याबाबत मार्गदर्शन केले.
वक्त्या हर्षदा ठाकूर यांनी तरुण पिढीमध्ये सामाजिक सजगता, कायद्याचे पालन आणि मुलींच्या सन्मानाचे रक्षण करण्याचे महत्त्व अधोरेखित केले. सर्वांनी कायद्यावर पूर्ण विश्वास ठेवून तपास निष्पक्ष व वेगाने व्हावा, तसेच दोर्षीवर कडक कारवाई व्हावी अशी मागणी केली.
दरम्यान, २५ फेब्रुवारी रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास आरोपीने आपल्या एका साथीदाराच्या मदतीने विद्यार्थिनीला लग्राचे आमिष दाखवून बळजबरीने फिल्मी स्टाईल पळवून नेले होते. या घटनेनंतर परिसरात संतापाची लाट उसळली होती. यासंदर्भात पैठण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
आरोपीला एक दिवसाची पोलिस कोठडी
या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या चिराग अतहर अहमद फारुकी या शिक्षकाला पैठण येथील न्यायालयाने एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली. दरम्यान, पोलिसांकडून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे.