

Efforts to make the municipal corporation corruption-free!
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : शहरातील सर्वसामान्य जन-तेला सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासोबतच महापालिका भ्रष्ट्राचारमुक्त करण्याचा प्रयत्न असून, मित्रांनीच मला सूचना कराव्यात, तुमच्या सुचनांचा निश्चित विचार करून शहराला शिस्त लावून बदलण्याचा प्रयत्न करू या, असा मानस महापौर समीर राजुरकर यांनी व्यक्त केला. सरस्वती भुवन प्रशा-लेच्या १९९३ च्या बॅचमधील सर्व मित्रांनी शहराच्या महापौरपदी राजुरकर यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा कौतुक सोहळा आयोजित केला होता. याप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी महापौर राजुरकर म्हणाले, शाळेतील शिक्षकांनी माझ्यावर जात व धर्म न पाळता माणूसकी जपण्याचे केलेल्या संस्कारांच्या जोरावरच आज मी शहराचा महापौर झालो. तुम्ही मित्रच माझे कान, नाक, डोळे आहात. मनपातर्फे होणारी कामे शहरात तुम्हाला निकृष्ट जागोजागी पडलेला कचरा यासह इतर काही बाबी निदर्शनास आल्यास तातडीने मला कळवा, तुमचा मित्र सदैव तुमच्या सेवेत तैनात आहे, असा मानसही राजुरकर यांनी व्यक्त केला.
या कौतुक सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी ज्ञानप्रकाश मोदानी, तर प्रमुख पाहुणे म्हणून सेवानिवृत्त शिक्षक अशोक लाटे, व्ही. जी. घायाळ, वसंत खांडगौरे, मधुकर घोडके, रश्मी बोरीकर, कविता निरखी आर्दीची उपस्थित होती. या कौतुक सोहळ्याला महापौर राजुरकर यांच्या कुटुंबास आमंत्रित करण्यात आले होते. दरम्यान, शाळेतील शिक्षकांचे आशीर्वाद आणि मित्रांच्या सदिच्छामुळेच मला शहराचा प्रथम नागरिक होण्याचा मान मिळाला महापालिकेतून सर्वसामान्य जनतेला सोयीसुविधा उपलब्ध करून महापालिका देण्यासोबत भ्रष्ट्राचारमुक्त करण्याचा प्रयत्न आहे, असे राजूरकर यावेळी म्हणाले.
आमच्यासाठी सर्वोच्च आनंदाचा क्षण...
स. भु. प्रशालेत शिकणाऱ्या बालपणाच्या मित्रांनी उत्साहात महापौर राजुरकर यांचे स्वागत केले. यावेळी अनेकांनी बालपणाच्या आठवणींना उजाळा दिला. आमच्या सम्या मागच्या बाकावर बसायचा. कायम काही काही विचारून भंडावून सोडायचा. कधीही कुणाशी भांडला नाही, कुणालाही कधी दुखावले नाही.
त्यामुळेच ३५ वर्षांचा कालावधी लोटला तरी आमच्यासाठी तो सम्याच आहे. राजुरकर यांच्या नावाची महापौरपदासाठी घोषणा झाल्यावर आम्हाला झालेला आनंद गगनात मावत नव्हता. अशा आठवणी सांगताना आनंद घोटनकर, डॉ. मंदार देशपाडे, योगेश इतरकर, मंगेश पळसकर यांचे डोळे पानावले होते. तर आमचा सम्या महापौर झाला हा आमच्यासाठी सर्वोच्च आनंदाचा क्षण असल्याचेही राजुरकर यांच्या मित्रांनी सांगितले.