Congress Protest : शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख अनुदान द्या

काँग्रेसचा जनआक्रोश दुष्काळ मोर्चा : सरसकट मदत, कर्जमाफीची मागणी
Congress Protest
Congress Protest : शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख अनुदान द्याfile photo
Published on: 
Updated on: 

Provide a subsidy of one lakh rupees per hectare to farmers congress

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी एक लाख रुपये, तर शेतमजुरांना ५० हजार रुपये अनुदान द्यावे, या मागणीसाठी काँग्रेसच्या वतीने बुधवारी (दि. १४) पैठण गेट ते विभागीय आयुक्त कार्यालयापर्यंत जनआक्रोश दुष्काळ मोर्चा काढण्यात आला. शेतकऱ्यांना निकष न लावता सरसकट मदत द्यावी, संपूर्ण कर्जमाफी करावी, पीकविमा मिळावा आणि विद्यार्थ्यांची शैक्षणिक फी माफ करावी, अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या. शेतकऱ्यांना न्याय मिळेपर्यंत काँग्रेस शांत बसणार नाही, असा इशारा प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिला.

Congress Protest
Drought : इतिहासाच्या पानांतून : पाऊसमान कमी, पिके उगवलीच नाहीत..

मराठवाड्यात पावसाअभावी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, शेतकरी गंभीर आर्थिक संकटात सापडले आहेत. या पार्श्वभूमीवर बुधवारी काँग्रेसच्यावतीने आयोजित मोर्चात जालना, बीड, धाराशिव, लातूर, नांदेडसह विविध जिल्ह्यांतील शेतकरी आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. सकाळी ११ वाजता नियोजित असलेल्या मोर्चाला दुपारी दीड वाजता सुरुवात झाली.

गुलमंडी, सिटीचौक, शहागंज आणि चेलीपुरामार्गे मोर्चा विभागीय आयुक्त कार्यालयावर धडकला. मोर्चाच्या मार्गावर ठिकठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. दरम्यान विभागीय आयुक्त कार्यालयासमोर मोर्चाचे सभेत रूपांतर झाले. शेतकरी उन्हात बसणार असल्याने व्यासपीठावरही सावलीची व्यवस्था करण्यात आली नव्हती.

राज्य सरकार मुके, बहिरे आणि आंधळे झाल्याची टीका करत, शेतकऱ्यांच्या खात्यावर पाच हजार रुपये जमा करण्याचा निर्णय म्हणजे शेतकऱ्यांची थट्टा असल्याचे ते म्हणाले. उद्योजकांना मदत करताना सरकार पुढाकार घेते. मात्र कर्जमाफीची वेळ आली की निकषांचा आधार घेतला जातो. सावकार आणि मायक्रोफायनान्स कंपन्यांचे प्रतिनिधी कर्जवसुलीसाठी ग्रामीण भागात आल्यास त्यांना पैसे देऊ नका, असे आवाहनही त्यांनी केले.

Congress Protest
Water Heater Shock : हिटरचे बटन बंद न करताच पाण्यात हात; शॉक लागून १४ वर्षीय मुलीचा मृत्यू

मोर्चाचे आयोजक खासदार डॉ. कल्याण काळे यांनी शेतकऱ्यांना उपाशी झोपू देऊ नका, असे आवाहन करत सरकारने मदतीबाबत वेळकाढूपणा करू नये, असे सांगितले. या मोर्चात माजी मंत्री बाळासाहेब थोरात, लातूरचे खासदार डॉ. शिवाजी काळगे, नांदेडचे खासदार रवींद्र चव्हाण, शहराध्यक्ष सय्यद अक्रम, जिल्हाध्यक्ष किरण पाटील डोणगावकर, प्रदेश पदाधिकारी कमाल फारुकी, माजी आमदार नामदेव पवार, डॉ. सरताज पठाण, गुलाब पटेल आणि युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विश्वास औताडे यांच्यासह अन्य पदाधिकारी

अदानी-अंबानींचे कर्ज माफ होते, शेतकऱ्यांचे का नाही?

काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी डॉ. सिरीवेल्ला प्रसाद यांनी मराठवाड्यात वर्षभरात एक हजारांहून अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचा दावा केला. दररोज जवळपास तीन शेतकरी आत्महत्या करत असताना सरकारची जबाबदारी काय, असा सवाल त्यांनी केला. अदानी-अंबानींची कर्जे माफ होतात, मग शेतकऱ्यांची का नाहीत, असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी सरकारवर जनतेचा आवाज दडपल्याचा आरोप केला.

बाजरी, ज्वारीची करपलेली कणसे

या मोर्चात शेतकऱ्यांनी पाण्याअभावी करपलेली ज्वारी, बाजरीसह अन्य पिके हातात घेत सहभागी झाले होते. तर प्रति हेक्टरी एक लाख मदत द्या, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क माफ करा यासह विविध मागण्यांचे फलक हाती घेतले होते. तर पारंपरिक वेशभूषेत बंजारा समाजाच्या महिला मोर्चात सहभागी झाल्या होत्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news