Water Heater Shock : हिटरचे बटन बंद न करताच पाण्यात हात; शॉक लागून १४ वर्षीय मुलीचा मृत्यू

जयभवानीनगरमधील हृदयद्रावक घटना
Sambhajinagar News
Sambhajinagar News : हिटरचे बटन बंद न करताच पाण्यात हात; शॉक लागून १४ वर्षीय मुलीचा मृत्यू file photo
Published on: 
Updated on: 

Sambhajinagar News : Hand in water without turning off heater button; 14-year-old girl died of shock

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : नातेवाईकाच्या मृत यज्ञा देवरे लावलेला हिटर एका १४ तेराव्याच्या विधीसाठी बाहेरगावी जाण्याची घरात पहाटेपासून लगबग सुरू असताना, बाथरुममध्ये पाणी तापवण्यासाठी वर्षीय मुलीसाठी कर्दनकाळ ठरला. लवकर निघायचे म्हणून घाईघाईत अंघोळीला गेलेल्या मुलीने हिटरचे बटन बंद न करताच बादलीतील पाण्यात हात घातला.

Sambhajinagar News
Sambhajinagar News : मावेजा घोटाळ्यातील तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांना जामीन

विजेचा तीव्र धक्का बसल्याने तिचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. ही हृदयद्रावक घटना बुधवारी (दि. १४) पहाटे सहा वाजेच्या सुमारास मुकुंदवाडी परिसरातील जयभवानीनगर येथे घडली. यज्ञा प्रकाश देवरे (१४, रा. गल्ली क्र. ११, जयभवानीनगर, मुकुंदवाडी) असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे. ती इयत्ता नववीत शिकत होती आणि अभ्यासात अत्यंत हुशार होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, देवरे यांच्या जवळच्या नातेवाईकाचे नुकतेच निधन झाले होते. बुधवारी त्यांचा तेरावा असल्याने तिथे जाण्यासाठी घरात पहाटेपासूनच तयारी सुरू होती. सकाळी सहा ते साडेसहाच्या सुमारास यज्ञाची आई, मोठा भाऊ आणि मामा असे सर्वजण कारने निघणार होते. आई स्वयंपाकाची तयारी करत होती, तर लवकर निघायचे म्हणून यज्ञा सर्वात आधी अंघोळीसाठी बाथरुममध्ये गेली.

Sambhajinagar News
Sambhajinagar News : वाटणीपत्राआधारे तब्बल १०० एकरची प्लॉटिंग

अंघोळीचे पाणी तापवण्यासाठी बादलीत इमर्शन हिटर लावलेला होता. पाणी तापल्यानंतर घाईगडबडीत हिटरचे बटन बंद करायचे यज्ञाच्या विस्मरणात गेले आणि तिने थेट बादलीतील पाण्यात हात घातला. क्षणात विजेचा जोरदार धक्का बसून ती बाथरुममध्येच कोसळली. भावाने दरवाजा तोडला, पण उशीर झाला बाथरुमचा दरवाजा आतून कडी लावून बंद होता. विजेचा जोरदार धक्का बसल्याने यज्ञाचा हात किंवा पाय बाथरुमच्या दरवाजावर आदळला आणि खडखड असा मोठा आवाज झाला.

आवाज ऐकताच घरात असलेल्या आई आणि भावाने बाथरुमच्या दिशेने धाव घेतली. त्यांनी यज्ञाला जोराने हाका मारल्या. मात्र आतून कसलाही प्रतिसाद आला नाही. काहीतरी विपरीत घडल्याची शंका आल्याने भावाने क्षणाचाही विलंब न लावता लाथा मारून बाथरुमचा दरवाजा तोडला आणि आत प्रवेश केला. आत जाताच त्याने सर्वात आधी हिटरचा मुख्य वीजपुरवठा बंद केला. यज्ञा बाथरुमच्या फरशीवर बेशुद्धावस्थेत पडलेली होती. कुटुंबीयांनी तिला तत्काळ उचलून उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात नेले. मात्र, गंभीर अवस्था पाहून तेथील डॉक्टरांनी तिला घाटीत हलवण्याचा सल्ला दिला. सकाळी ६ वाजून २५ मिनिटांच्या सुमारास घाटीतील डॉक्टरांनी तपासून यज्ञाला मृत घोषित केले.

आईचा आधार हिरावला

यज्ञाची आई राजश्री प्रकाश देवरे या कांचनवाडी येथील कृषी विभागात नोकरी करून संपूर्ण संसाराचा गाडा एकहाती हाकत होत्या. तिचा २२ वर्षीय मोठा भाऊ घाटी परिसर परिसरात पॅथॉलॉजी लॅबमध्ये काम करतो. नववीत शिकणारी यज्ञा अत्यंत चुणचुणीत आणि हुशार असल्याने तिच्याकडून कुटुंबाला मोठ्या आशा होत्या. मात्र, तिच्या अशा अचानक जाण्याने देवरे कुटुंबावर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला असून, परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. याप्रकरणी मुकुंदवाडी ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास हेड कॉन्स्टेबल प्रकाश धात्रक करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news