Drought : इतिहासाच्या पानांतून : पाऊसमान कमी, पिके उगवलीच नाहीत..

पाणी नसल्‍याचे मोठ्या प्रमाणात स्‍थलांतर
Drought News
छत्रपती संभाजीनगरात दुष्‍काळग्रस्‍तांसाठी उभारलेल्‍या छावणीचे छायाचित्र. (संदर्भ : राजा लाला दीनदयाल यांच्या संग्रहालयातून )file photo
Published on: 
Updated on: 

Drought: From the pages of history: Low rainfall, crops did not grow

पुढारी वृत्तसेवा : १८९९ मध्ये समाधानकारक पाऊस न पडल्‍यामुळे हे वर्ष मराठवाड्यासाठी तीव्र दुष्काळाचे ठरले. त्‍या काळातील अंदाजानुसार वार्षिक पर्जन्‍यमान्न्म ३४ इंच होते. १८९९ ला सरासरी केवळ १५-४९ इंच पाऊस बरसला. निझाम संस्‍थानातील एकूण ११२ तालुक्यांपैकी एकाहत्तर तालुक्यांमध्ये पाऊस सरासरीच्या निम्म्याहून कमी होता, मोजक्‍या भागात काही प्रमाणात वृष्टी झाल्‍याने दुष्‍काळाची स्‍थिती टळली. परंतु छत्रपती संभाजीनगर, बीड, परभणी, नळदुर्ग, नांदेड, गुलबर्गा, बिदर हे जिल्‍ह्ये दुष्‍काळाने होरपळले. या जिल्‍ह्यात केवळ २५ टक्‍के क्षेत्रांवर खरीप पिकांची उगवण झाली. रब्बीची उगव काही भागात शून्‍य टक्‍केच होती.

Drought News
Sambhajinagar News : मावेजा घोटाळ्यातील तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांना जामीन

निझामाने तेव्‍हा अलेक्झांडर जॉनस्टोन डनलप (ए. जे. डनलप) या ब्रिटिश अधिकार्‍याला सेवेत घेतले होते. निझाम सरकारच्या सेवेत असताना प्रामुख्याने महसूल आणि दुष्काळ निवारण क्षेत्रात मोलाचे योगदान दिले. १९०० मधील दुष्‍काळावर त्‍यांनी लिहिलेला अहवाल आजही उपयुक्‍त आहे. 'फॅमिन कमिशनर' (दुष्काळ आयुक्त) म्हणून निझामाने त्‍यांची नियुक्‍यी केली होती. ते अहवालात लिहितात, शेतकऱ्यांनी १८९८ च्या हंगामात जवारीची लागवड नेहमीपेक्षा खूप मोठ्या क्षेत्रावर केली. पाऊस मुबलक झाल्यामुळे धान्य आणि चाऱ्याचे उत्पादन भरपूर झाले. चाऱ्याचा साठा इतका मोठा होता की, तो वर्षभरात विकला जाऊ शकला नाही, किंवा निदान विकला गेला तरी नाही, आणि तो १९०० च्या दुष्काळी वर्षासाठी उपलब्ध झाला.

अनेक लोकांनी चाऱ्याच्या विक्रीतून चांगला नफा कमावला असावा, आणि मागील वर्षाच्या मुबलक पुरवठ्यामुळे अनेक शेतकऱ्यांना दुष्काळाच्या काळात आपली नांगरणीची जनावरे जिवंत ठेवण्यास मदत झाली. अर्थात जनावरांचे नुकसान खूप मोठे झाले. परंतु जर मागील वर्षाचा अतिरिक्त साठा उपलब्ध नसता, तर हे नुकसान आणखी मोठे झाले असते. पशुधनाच्या मृत्यूची आकडेवारी ७,२१,५४२ होती. हे प्रमाण पशुधनाच्या १४ टक्के आहे. शेतीसाठी वापरल्या जाणाऱ्या साधनांचे, म्हणजेच नांगरणी आणि पाणी उपसण्याच्या साधनांचे, नुकसान ४,८३,५२० किंवा २४८ टक्के झाले.

Drought News
Nanded News : हिवाळी परीक्षेचे शुल्क माफ; स्वारातीम विद्यापीठाचा निर्णय

हंगामाच्या सुरुवातीच्या काळात, आणि बऱ्याच अंशी उन्हाळ्याचा काळ बराच पुढे सरकेपर्यंत, लगतच्या ब्रिटिश जिल्ह्यांमध्ये लोकांचे स्थलांतर होत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. यासंदर्भातील आकडेवारी विश्वसनीय नाही. उपलब्ध माहितीनुसार, एकूण २१,७२८ लोकांनी स्थलांतर केले, तर बाहेरून आलेल्यांची (आगमन झालेल्यांची) संख्या ९,२०७ इतकी होती. स्थलांतराच्या या आकड्यांवर विसंबून राहणे अशक्य आहे; कारण अनेक लोकांनी कामाच्या शोधात आपली गावे सोडली होती किंवा गावातील पाणीपुरवठा बंद पडल्यामुळे त्यांना गाव सोडावे लागले होते. १३,००० हून दुष्‍काळग्रस्‍तांसाठी उभारलेल्‍या (पुअर हाउसेसमध्ये) ठेवण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news