Sambhajinagar News : मालमत्ता कर, पाणीपट्टीची थकबाकी १२७९ कोटींवर

शासकीय कार्यालयांकडेच १९.७६ कोटी थकले, दुबार कर आकारणीकडे दुर्लक्षच
Sambhajinagar News
Sambhajinagar News : मालमत्ता कर, पाणीपट्टीची थकबाकी १२७९ कोटींवरfile photo
Published on
Updated on

Property Tax and Water Bill Arrears Soar to ₹1,279 Crore

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : महापालिकेने आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये मालमत्ता कर आणि पाणीपट्टीची रेकॉर्ड ब्रेक वसुली केली आहे. मात्र यंदाही एप्रिलपासूनच कर वसुलीकडे प्रशासनाने विशेष लक्ष दिले आहे. परंतु न्यायप्रविष्ट प्रकरणांतील १२ कोटी, शासकीय कार्यालयांकडील १९ कोटी यासह दुबार कर आकारणीत दुरुस्ती न केल्याने कर वसुलीच्या थकबाकीचा आकडा तब्बल १२७९ कोटींवर पोहोचला आहे.

Sambhajinagar News
Tax Collection : कर वसुलीसाठी मनपाचा डिजिटल फॉर्म्युला

महापालिकेने गतवर्षी मालमत्ता कर, पाणीपट्टी, नगर रचना, गुंठेवारीतून सुमारे ४०० कोटी रुपयांचे विक्रमी उत्पन्न मिळविले आहे. यात मालमत्ता कर आणि पाणीपट्टी वसुलीचाच विचार केला, तर महापालिका आस्तित्वात आल्यापासून म्हणजेच ३२ वर्षांत पहिल्यांदाच कर वसुली २०० कोटींपार गेली आहे. मात्र असे असतानाही मालमत्ता कराच्या थकबाकीची आकडेवारी हे वाढतच आहे.

आर्थिक वर्ष २०२६-२७ मधील मालमत्ता कर वसुलीच्या मागणीचा विचार केला तर केवळ १६५ कोटी रुपयांची कर वसुली करायची आहे. परंतु कर वसुली योग्यपद्धतीने होत नसल्याने थकबाकीचा आकडा १२७९ कोटी रुपयांवर गेला आहे. ही थकीत रक्कम वसूल कोटी रुपयांचा सांगण्यात आले. करताना प्रशासनाच्या नाकीनऊ येत आहेत.

Sambhajinagar News
Sambhajinagar News : मनपाची उद्या स्थायी समिती सभा

स्थायी समिती सभापती अनिल मकरिये यांनी नुकतीच स्थायी समितीची विशेष बैठक घेऊन उत्पन्नवाढीवर चर्चा घडवून आणली. त्यात शासकीय मालमत्ता व न्यायालयीन वादात तब्बल ४५.९३ कर अडकला असल्याचे १२६ जण न्यायालयात महापालिकेने आकारलेल्या मालमत्ता कराविरोधात १२६ जणांनी न्यायालयात धाव घेतली आहे. त्यांच्याकडे २६.१७ कोटी रुपयांच्या मालमत्ता कराची थकबाकी आहे.

शासकीय कार्यालयांकडील थकबाकी

पोलिस विभाग (५० मालमत्ता) - ६.६४ कोटी

रेल्वे विभाग (४ मालमत्ता) - ५.८९ कोटी

* बीएसएनएल (११ मालमत्ता) - ४.५१ कोटी

*विद्युत मंडळ (३१ मालमत्ता) - १.३८ कोटी

* चिकलठाणा जिल्हा रुग्णालय १.३४ कोटी

शैक्षणिक संस्थांकडील थकबाकी

*एमआयटी कॉलेज ५.३० कोटी

*भगवान शिक्षण प्रसारक मंडळ ३.५८ कोटी

* अजंठा शिक्षण संस्था, शिवाजीनगर १.७३

कोटी

* विद्युत मंडळ (३१ मालमत्ता) १.३८ कोटी * फ्रान्सलियन स्कूल ऑफ एक्सलन्स -

६३.१८ लाख.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news