

Municipal Corporation's Standing Committee Meeting Tomorrow
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा महापालिकेची सोमवारी (दि. १३) दुसरी स्थायी समिती सभा होणार आहे. यात रस्ते, सबस्टेशन, एसटीपी देखभाल दुरुस्ती, वाहतूक सुर-क्षेचे साईन बोर्ड अशी विविध ६ कोटी ९९ लाख रुपये खर्चीच्या विकासकामांचे १६ तर याशिवाय वैद्यकीय परताव्याचे ४ असे एकूण २० प्रस्ताव प्रशासनाकडून मंजुरीस्तव सादर केले आहेत. यासोबतच अर्थसंकल्पीय सभेच्या इतिवृत्त मंजुरीचा देखील प्रस्ताव समाविष्ट आहे.
महापालिकेवर सलग साडेपाच वर्षे प्रशासन होते. त्यामुळे स्थायी समिती आणि सर्वसाधारण सभेत नेमक्या कोणत्या विषयांना मंजुरी देण्यात आली, याबाबत तब्बल तीन ते चार महिन्यांनंतरच माहिती जाहीर केली जात होती. परंतु, महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर प्रशासक राज संपले आहे. लोकप्रतिनिधी सत्तेत आले असून नव्या टीमने आता कामाचा सपाटा सुरू केला आहे.
महापौर समीर राजूरकर यांनी पहिल्या सभेत काही आवश्यक विषयांना मंजुरी देत कामकाजाला सुरुवात केली आहे. तर स्थायी समितीची पहिली अर्थसंकल्पीय सभा झाल्यानंतर विकासकामांचे प्रस्ताव सादर होण्यास सुरुवात झाली आहे. येत्या सोमवारी (दि. १३) सभापती अनिल मकरिये यांच्या अध्यक्षतेखाली स्थायी समितीची सभा होणार आहे. या सभेत प्रशासनाने विविध ६ कोटी ९९ लाख रुपये खर्चीच्या विकासकामांचे प्रस्ताव मंजुरीस्तव सादर केले आहेत.
यात झोन १० अंतर्गत गोलवाडी येथील रस्ता मजबुतीकरण ३४ लाख ३७ हजार खचर्चाच्या प्रस्तावासह रस्ता रुंदीकरणात काढण्यात आलेल्या मुकुंदवाडीतील विद्यापीठ कमान समोर रस्ता तयार करण्यासाठी ३३ लाख ७५ हजारांचा, विद्यानगर येथील उद्यानाचे नूतनीकरणासाठी ४९ लाख ९४ हजार रुपयांचा, विभागीय क्रिडा संकुलमध्ये अॅथलेटिक्स मैदानावर विद्युत रोषणाईसाठी ५०० केव्हीएचे सबस्टेशन तयार करण्यासाठी ७८ लाख ३ हजार रुपये खर्चीची सलीम अली सरोवर येथील सिव्हरेज ट्रिटमेंट प्लांटचे दहा वर्षे देखभाल दुरुस्तीसाठी ४ कोटी ४ लाख रुपयांचा,
रोजेबाग येथील काँक्रिट रस्त्याच्या कामाचा १९ लाख ८७ हजार रुपयांचा, सिद्धार्थ उद्यानातील जलतरण तलाव येथील प्रेक्षक गॅलरी दुरुस्तीचा ३८ लाख ३५ हजार रुपये खर्चीचा, विविध चौकांमध्ये वाहतूक नियमांची माहिती देणारे साईनबोर्ड लावण्यासाठी २३ लाख ८२ हजार रुपये खचीचे प्रस्ताव सादर केले आहेत.मालमत्ता कर जैसेथेच महापालिकेकडून अगामी वर्षासाठी मालमत्ता कर आकारणीत कुठलीही वाढ केलेली नाही. गतवर्षाप्रमाणेच कर, थकबाकीवरील शास्ती आणि इतर शुल्क ठेवून प्रस्ताव स्थायी समितीपुढे मंजुरीस्ताव ठेवला आहे.
मालमत्ता कर जैसे थेच
महापालिकेकडून अगामी वर्षासाठी मालमत्ता कर आकारणीत कुठलीही वाढ केलेली नाही. गतवर्षाप्रमाणेच कर, थकबाकीवरील शास्ती आणि इतर शुल्क ठेवून प्रस्ताव स्थायी समितीपुढे मंजुरीस्ताव ठेवला आहे.