Paithan Murder Case | पैठण हत्याकांडाचा छडा; ४८ तासांत मारेकऱ्यांना बेड्या, मूकबधिर मामाचा भाचे जावयानेच केला खून

प्रकरणात एका विधीसंघर्षित बालकाचाही समावेश
Paithan Murder Case
कृष्णा पंढरीनाथ धनवाडेPudhari
Published on
Updated on

Paithan Murder Case

पैठण: पाटेगाव येथील गोदावरी नदीपात्रात पोत्यात भरलेल्या अवस्थेत आढळलेल्या मृतदेहाचे गूढ उकलण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. किरकोळ वादातून मूकबधिर मामाचा गळा आवळून खून करणाऱ्या भाचे जावयासह त्याच्या साथीदाराला पोलिसांनी ४८ तासांच्या आत अटक केली आहे. या प्रकरणात एका विधीसंघर्षित बालकाचाही समावेश आहे.

नदीपात्रात आढळला होता मृतदेह

सोमवारी (दि. १५) पाटेगाव येथील गोदावरी नदीत हात-पाय बांधलेल्या अवस्थेत एका तरुणाचा मृतदेह पोत्यात बंद करून फेकलेला आढळला होता. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली होती. पोलिसांनी तातडीने तपास चक्रे फिरवून मृतदेहाची ओळख पटवली. कृष्णा पंढरीनाथ धनवाडे (वय ४०, रा. गदेवाडी, ता. शेवगाव, जि. अहिल्यानगर) असे मृताचे नाव असून तो मूकबधिर होता.

Paithan Murder Case
Sambhajinagar News अल्पवयीन मुलामार्फत नशेसाठी सिरप विक्री

असा उघड झाला गुन्हा

शवविच्छेदन अहवालात कृष्णाचा गळा आवळून खून केल्याचे समोर आले. गुन्हे शाखेने मयताच्या नातेवाईकांकडे चौकशी केली असता, कृष्णाचे त्याचे भाचे जावई सागर रामेश्वर केसापुरे (रा. देऊळगाव राजा, जि. बुलढाणा) याच्याशी पटत नसल्याची माहिती मिळाली. संशयावरून पोलिसांनी सागरला ताब्यात घेऊन पोलिसी खाक्या दाखवताच त्याने खुनाची कबुली दिली.

खुनाचे कारण आणि बनाव

आरोपी सागरने त्याचा साथीदार ऋषिकेश सखाराम गायकवाड (रा. दुधड, छत्रपती संभाजीनगर) आणि एका विधीसंघर्षित बालकाच्या मदतीने कृष्णाचा घरीच गळा आवळून खून केला. पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने त्यांनी मृतदेहाचे हात-पाय बांधले, तो एका पोत्यात भरला आणि पाटेगाव येथील गोदावरी नदीच्या पात्रात फेकून दिला.

Paithan Murder Case
Chatrapati Sambhajinagar Crime: मराठवाड्यात आणखी एका माजी सरपंचाची हत्या, 11 जणांनी केली अमानूष मारहाण; कारण काय?

तपास पथकाची कामगिरी

पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड, अपर पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंह, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील आणि गुन्हे शाखेचे निरीक्षक विजयसिंग राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि पवन इंगळे, पीएसआय महेश घुगे व त्यांच्या पथकाने अवघ्या ४८ तासांत या किचकट गुन्ह्याचा छडा लावला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news