

Preparations in full swing for Shravan in Khultabad, Verul
खुलताबाद, पुढारी वृत्तसेवा : आजपासून श्रावण महिन्याला सुरुवात होणार आहे. श्रावण महिन्याची सुरुवात ही उद्या पाहिल्याच शनिवारपासून सुरू होणार असून श्रावण महिन्यात चार शनिवार भक्तांना दर्शनसाठी भेटणार आहे. त्या अनुषंगाने श्री भद्रा मारुती संस्थान व वेरूळ येथील श्री घृष्णेश्वर मंदिर संस्थानच्यावतीने दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी दोन्ही संस्थानांनी जय्यत तयारी सुरू केली आहे.
खुलताबाद येथील श्री भद्रा मारुतीच्या दर्शनसाठी श्रावण महिन्यातील शनिवारी भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते तर वेरूळ येथील श्री घृष्णेश्वर महादेवाचे दर्शन घेण्यासाठी सोमवारी गर्दी करतात दर्शनसाठी येणाऱ्या भाविकांना पावसापासून सुरक्षित ठेवण्यासाठी मंदिर परिसरात तात्पुरते पत्राचे मोठे शेड उभारण्यात आले असून दर्शनासाठी महिलांसाठी स्वतंत्र रांगा लावण्याची व्यवस्था संस्थानच्या वतीने करण्यात आली आहे तसेच भाविकांना दर्शनासाठी कोणत्या प्रकारची अडचण होऊ नाही याची संस्थानच्या वतीने काळजी घेण्यात येत आहे, अशी माहिती संस्थान अध्यक्ष मिटू बारगळ सचिव कचरू बारगळ जनसंपर्क अधिकारी राजेंद्र जोंधळे यांनी दिली आहे.
श्रावण महिना सुरू होताच श्री भद्रा मारुती मंदिर परिसरात यात्रेचे स्वरूप येते. गेल्या दोन वर्षांपासून मंदिर परिसरात मोठे राहाट पाळणे, मौत का कुवा, छोट्या मुलांसाठी रेल्वे, खेळण्याची दुकाने सज्ज झाली आहेत. श्रावण महिन्यात येथे पर राज्यातील व्यावसायिक आपल्या व्यवसायासाठी येथे येतात.
श्रावण महिन्यात खुलताबाद व वेरूळ मंदिरात भाविकांची गर्दी लक्षात घेता दोन्ही ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. या काळात मोठा पोलिस बंदोबस्त राहणार आहे. जड वाहतूक दैलताबाद मार्गे वळविण्यात येणार वाहनाची संभाव्य गर्दी लक्षात घेऊन वाहतूक कोंडी टाळण्यासाठी खुलताबाद, छत्रपती संभाजीनगर, कन्नड, फुलंब्री मार्गावर ठिकठिकाणी वाहतूक पोलिस तैनात करण्यात येणार आहे.
श्रावण महिन्यात लाखोच्या संख्येने श्री भद्रा मारुतीच्या दर्शनाला भाविक येत असतात. त्यामुळे श्रावण शनिवारी मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी असते. त्या अनुषंगाने संस्थानच्या वतीने स्पेशल दर्शन, मंदिर गाभाऱ्यात अभिषेक सर्व बंद करण्यात आले आहे. सर्वांना एकाच रांगेत उभे राहून दर्शन घेता येणार आहे. दर्शन सुलभ होणार आहे. दर्शनरांगा महिलांसाठी स्वतंत्र असेल असे संस्थानच्या वतीने कळविण्यात आले आहे.