गर्भवती अल्पवयीन भाची सुनेवर अत्याचार

नराधम मामे सासरा अन् मेहुण्याला २० वर्षांची जन्मठेप
Rape Case
गर्भवती अल्पवयीन भाची सुनेवर अत्याचार(File Photo)
Published on
Updated on

Pregnant minor niece, daughter-in-law, tortured

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा गर्भवती अल्पवयीन भाची सुनेवर बलात्कार केल्याप्रकरणी मामे सासरा व त्याच्या मेहुण्यास २० वर्षांची जन्मठेप व ३७ हजार रुपये दंडाची शिक्षा जिल्हा न्यायाधीश श्रीमती आर. डी. खेडेकर यांनी बुधवारी (दि.४) सुनावली. पीडिता व आरोपी हे देवगाव रंगारी पोलिस ठाणे हद्दीतील दोन गावचे रहिवासी आहेत. १४ ऑक्टोबर २०२३ रोजीची घटना आहे.

Rape Case
अपघातग्रस्तांना मदत करा, २५ हजार रुपयांचे बक्षीस मिळवा

फिर्यादीनुसार, पीडिता ही घटनेच्या दिवशी १७ वर्षे ९ महिन्यांची होती. तिचे लग्न २०२२ मध्ये समाजाच्या रीतिरिव-ाजाप्रमाणे झाल्याचे फिर्यादीत नमूद आहे. घटनेदिवशी सकाळी पीडितेचा पती व सासरा हे मोसंबी तोडण्याच्या कामाला गेले होते.

घरात पीडिता व तिची सासू या दोघीच होत्या. पीडितेची सासू मानसिक रुग्ण असून, तिला पाहण्यासाठी तिचा भाऊ तथा आरोपी व त्याचा मेहुणा असलेला दुसरा आरोपी आलेले होते. पीडितेच्या मामे सासऱ्याने त्याच्या बहिणीला म्हणजे पीडितेच्या सासूला काही तरी सांगून घराबाहेर पाठवून दिले व अत्याचार केला.

Rape Case
पोलिसाचा हॉटेल चालकावर चाकूहल्ला

त्याच्यानंतर सोबतच्या त्याच्या मेहुण्यानेही अत्याचार केला. यावेळी आपण गर्भवती असल्याचे सांगूनही त्यांनी अत्याचार करताना मारहाण केल्याचे तक्रारीत नमूद आहे. या प्रकरणी देवगाव रंगारी पोलिस ठाण्यात आरोपींविरुद्ध पोक्सो कायद्यासह बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या प्रकरणाचा पोलिस उपविभागीय अधिकारी श्रीमती स्वामी यांनी तपास केला. प्रभारी अधिकारी म्हणून पोलिस ठाण्याचे संदीप राजपूत यांनी काम पाहिले. सरकारी अभियोक्ता सुजाता देशमुख-पाठक यांनी चार साक्षीदार तपासले. पैरवी अधिकारी म्हणून संजय धुमाळ यांनी तर कोर्ट पैरवी अधिकारी म्हणून विद्या हिरालाल चव्हाण, श्रीमती व्ही. जी. कबाडे यांनी काम पाहिले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news