अपघातग्रस्तांना मदत करा, २५ हजार रुपयांचे बक्षीस मिळवा

राह-वीर योजनेचा प्रचार करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश, जिल्हा रस्ता सुरक्षा समितीच्या बैठकीत शून्य अपघात अभियानावर भर.
sambhajinagar news
अपघातग्रस्तांना मदत करा, २५ हजार रुपयांचे बक्षीस मिळवाfile photo
Published on
Updated on

Help accident victims, get a reward of Rs. 25,000

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : रस्ते अपघातात जखमी झालेल्यांना मदत केल्यास पोलिसांच्या चौकशीचा ससेमिरा मागे लागेल, या भीतीने अनेक जण मदत करण्याचे टाळतात. मात्र आता अशा अपघातग्रस्तांना तत्परतेने मदत करून त्यांचे प्राण वाचवणाऱ्या ममृत्युंजय दूतांनाफ शासनाच्या मराह-वीरफ योजनेअंतर्गत तब्बल २५ हजार रुपयांचे बक्षीस देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. या योजनेची माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवावी, असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी गुरुवारी (दि.५) दिले.

sambhajinagar news
मालमत्ता कर थकला, मनपाकडून सहा व्यावसायिक मालमत्ता सील

जिल्हाधिकारी कार्यालयात गुरुवारी जिल्हा रस्ता सुरक्षा समितीची बैठक पार पडली, त्यावेळी जिल्हाधिकारी स्वामी बोलत होते. या बैठकीस पोलिस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड, निवासी उपजिल्हाधिकारी जनार्दन विधाते, प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय काठोळे, कार्यकारी अभियंता प्रिया पुजारी, सहाय्यक अधीक्षक अभियंता पूजा रावळे, उपविभागीय अभियंता श्रीराम ढाकणे, डी. एम. कोलते, मनपा कार्यकारी अभियंता अमोल कुलकर्णी, जिल्हा साथरोग अधिकारी डॉ. सारिका लांडगे, डॉ. महेश लड्डा, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी संदीप शेलार,

महामार्ग पोलिस निरीक्षक किशोर चौधरी, राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अनिकेत कुलकर्णी, वाहतूक उपायुक्त सुभाष भुजंग, वाहतूक पोलिस निरीक्षक आनंद झोटे आदी उपस्थित होते. तसेच, मसेव्ह लाईफ फाउंडेशनफ्चे निलेश साळुंखे, गौतम सिंग आणि वैष्णवी कारेकर हे दूरदृश्यप्रणालीद्वारे (व्हिडिओ कॉन्फरन्सिंग) जिल्हाधिकारी छत्रपती संभाजीनगर जिल्हा रस्ता सुरक्षा समितीच्या बैठकीत मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी दिलीप स्वामी सहभागी झाले होते.

sambhajinagar news
राष्ट्रसेवेमुळे भाजप यशाचे उंच शिखर गाठणार : चव्हाण

सेव्ह लाईफ फाउंडेशन या संस्थेने २०२३-२४ मध्ये केलेल्या सर्वेक्षणानुसार, जिल्ह्यात २०९ अपघातप्रवण स्थळे (ब्लॅक स्पॉट्स) निश्चित करण्यात आली आहेत. जिल्ह्यात शून्य अपघात अभियान राबविण्याच्या दृष्टीने या अपघातप्रवण स्थळांचे निर्मूलन करण्यास प्राधान्य दिले जात आहे. अपघातप्रसंगी मदत करण्यासाठी लोक निर्भयपणे पुढे यावेत, यासाठी मराह वीरफ योजनेची व्यापक जनजागृती करण्याचे आणि त्यासाठी तातडीने जिल्हास्तरीय समिती गठित करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.

अपघातप्रवण स्थळांचे होणार भौगोलिक अंकन

जिल्ह्यात निश्चित करण्यात आलेल्या अपघातप्रवण स्थळांचे आता भौगोलिक अंकन (जिओ टॅगिंग) करण्यात आले आहे. या अंकनाची माहिती भौगोलिक स्थान सेवा पुरविणाऱ्या (नेव्हिगेशन) संस्थांना दिली जाणार आहे. जेणेकरून वाहनचालकांना प्रवासादरम्यान पुढे येणाऱ्या अपघातप्रवण स्थळाबाबत त्यांच्या मोबाईलवर आगाऊ (अलर्ट) सूचना मिळेल. तसेच रस्ते अपघातातील जखमींना अपघात झाल्यापासून ते प्रत्यक्ष उपचार मिळेपर्यंतचा कालावधी (रिस्पॉन्स टाईम) कमीत कमी करण्यासाठी १०८ फक्रमांकाच्या रुग्णवाहिकांची व्यवस्था अधिक सुसज्ज ठेवण्याचे निर्देशही जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news