पोलिसाचा हॉटेल चालकावर चाकूहल्ला

आरोपी पोलिस कर्मचाऱ्याला तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे.
Knife Attack
पोलिसाचा हॉटेल चालकावर चाकूहल्लाFile Photo
Published on
Updated on

Policeman stabs hotel driver

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा: दारूच्या बाटलीवरील केवळ ९० रुपये कमी न केल्याच्या रागातून एका पोलिस कर्मचाऱ्याने हॉटेल चालकासह त्याच्या कुटुंबावर चाकूने भीषण हल्ला केला. या हल्ल्यात तिघे जण गंभीर जखमी झाले. ही घटना मंगळवारी (दि.३) धूलिवंदनाच्या दिवशी करमाड भागातील पिंपळगाव पांढरी शिवारात घडली. आरोपी पोलिस कर्मचाऱ्याला तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे. नितेश विक्रम जाधव असे आरोपी पोलिस कर्मचाऱ्याचे नाव आहे.

Knife Attack
राष्ट्रसेवेमुळे भाजप यशाचे उंच शिखर गाठणार : चव्हाण

करमाड पोलिस ठाण्याच्या हद्दीतील पिंपळगाव पांढरी येथे वसुदेव लक्ष्मण सूर्यवंशी यांचे हॉटेल कार्तिक आहे. फिर्यादीनुसार, ३ मार्च रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास पोलीस कर्मचारी नितेश जाधव हा आपल्या साथीदारांसह हॉटेलमध्ये आला. त्याने काउंटरवर येऊन १३९० रुपये किमतीची दारूची बाटली १३०० रुपयांना मागितली.

हॉटेल चालक सूर्यवंशी यांनी ९० रुपये कमी करण्यास नकार दिला. याचा राग आल्याने जाधव याने शुभम सूर्यवंशी याच्या पोटात लाथ मारली. त्यानंतर खिशातून चाकू काढून नाना सूर्यवंशी यांच्या हातावर सपासप वार केले. हे भांडण सोडवण्यासाठी आणि मध्यस्थी करण्यासाठी पुढे आलेले दाजी संभाजी शिवाजी कल्होरे यांच्या पोटातही आरोपीने चाकू खुपसला.

Knife Attack
अपघातग्रस्तांना मदत करा, २५ हजार रुपयांचे बक्षीस मिळवा

या घटनेनंतर हॉटेलमधील सर्वांनी प्रसंगावधान राखत आर-ोपी नितेश जाधवला जागीच पकडले आणि थेट करमाड पोलिसांच्या हवाली केले. जखमींना उपचारासाठी तातडीने शहरातील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या गंभीर प्रकरणी नितेश जाधव आणि त्याच्या इतर चार साथीदारांवर करमाड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जाधव सोबत असलेल्या इतर तीन अनोळखी फरार साथीदारांचा पोलिस कसून शोध घेत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news