राष्ट्रसेवेमुळे भाजप यशाचे उंच शिखर गाठणार : चव्हाण

भाजपच्या चिकलठाणा येथील विभागीय कार्यालयात मराठवाडास्तरीय पंडित दीनदयाळ उपाध्यय प्रशिक्षण महाअभियान आयोजित केले होते.
sambhajinagar news
राष्ट्रसेवेमुळे भाजप यशाचे उंच शिखर गाठणार : चव्हाणfile photo
Published on
Updated on

BJP will reach the pinnacle of success due to national service: Chavan

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रसेवा, जनसेवेचे व्रत घेतलेले कार्यकर्तेच पक्ष-संघटनांची खरी ऊर्जा आहेत. त्यांच्या परिश्रमामुळेच भाजप अगामी काळात यशाच्या उंच शिखरावर पोहोचेल, असा ठाम विश्वास भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी गुरुवारी (दि.५) भाजपच्या चिकलठाणा येथील विभागीय कार्यालयात आयोजित मराठवाडास्तरीय पंडित दीनदयाळ उपाध्यय प्रशिक्षण महाअभियानात व्यक्त केला.

sambhajinagar news
Knife Attack : पाण्याचा ग्लास देण्यास नकार देताच पोलिसावर चाकूहल्ला

यावेळी भाजपाचे राष्ट्रीय सह संघटन मंत्री शिवप्रकाश, ओबीसी कल्याण मंत्री अतुल सावे, खासदार अजित गोपछडे, आमदार अनुराधा चव्हाण, माजी खासदार डॉ. भागवत कराड, प्रदेश उपाध्यक्ष संजय कौडगे, भाजपा सरचिटणीस राजेश पांडे, प्रदेश चिटणीस रेखा कुलकर्णी, प्रदेश चिटणीस वर्षा डहाळे

भाजपा अल्पसंख्याक मोर्चाचे अध्यक्ष इद्रिस मुलतानी, उपाध्यक्ष चैतन्यबापू देशमुख, मनोज पांगरकर, भाजपा अनुसूचित जाती मोर्चाचे अध्यक्ष विश्वजीत गायकवाड यांची उपस्थित होती. भाजपा परिवाराच्या वतीने देशभरात पंडित दीनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण महाअभियान राबवण्यात येत आहे.

sambhajinagar news
मालमत्ता कर थकला, मनपाकडून सहा व्यावसायिक मालमत्ता सील

यात विभागातील आठही जिल्ह्यांतील शहर आणि ग्रामीणचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. यात सुमारे साडेतीनशेहून अधिक पदाधिकारी या कार्यशाळेस उपस्थित राहिले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news