Livestock Slaughter : पोलिसांनी अवैध गोवंश कत्तलीचा प्रयत्न उधळला

एक ताब्यात, दुसरा फरार; शस्त्रांसह साहित्य जप्त
Livestock Slaughter : पोलिसांनी अवैध गोवंश कत्तलीचा प्रयत्न उधळ
Livestock Slaughter : पोलिसांनी अवैध गोवंश कत्तलीचा प्रयत्न उधळलाfile photo
Published on
Updated on

Police Thwart Attempt at Illegal Cattle Slaughter

वाळूज, पुढारी वृत्तसेवा : वाळूज पोलिसांनी रविवार (दि. २४) रोजी वाळूजलगतच्या नारायणपूरात धाडसी कारवाई करीत अवैध गोवंश कत्तलीचा प्रयत्न उधळून लावला. गावाच्या पूर्व बाजूस असलेल्या एका जुन्या वाड्यात छापा टाकून पोलिसांनी ९ गायींची सुटका केली. या प्रकरणी एका संशयितास ताब्यात घेण्यात आले तर दुसरा आरोपी फरार झाला आहे. विशेष म्हणजे नारायणपुरात यापूर्वीही अशा प्रकारची कारवाई करण्यात आली होती.

Livestock Slaughter : पोलिसांनी अवैध गोवंश कत्तलीचा प्रयत्न उधळ
Beed Crime : आष्टीत ‘धूम स्टाईल’ सोनसाखळी चोरांचा पर्दाफाश; दोन सख्खे मेहुणे गजाआड

या विषयी पोलिसांनी सांगितले की, वाळूज भागात गस्त घालणारे पोउपनि. रमेश राठोड यांच्या पथकाला नारायणपुरात गाईची अवैध कत्तल सुरू असल्याची माहीती मिळाली होती. रविवारी सकाळी वाळूज पोलिस ठाणे हद्दीतील नारायणपूरच्या पूर्व बाजूच्या एका जुन्या वाड्यावर छापा टाकला.

Livestock Slaughter : पोलिसांनी अवैध गोवंश कत्तलीचा प्रयत्न उधळ
Beef smuggling Paithan| पैठण-बालानगर परिसरात पोलिसांचा छापा; गोवंश कत्तलप्रकरणी ६ जणांवर कारवाई, २१५ किलो मांस जप्त

यावेळी तेथे गोवंश कत्तलीची तयारी सुरू असल्याचे निदर्शनास आले. घटनास्थळी ९ गायी आढळून आल्या. तसेच धारदार शस्त्रे, मीठ, पाण्याचे ड्रम, दोरखंड व इतर साहित्यही पोलिसांनी जप्त केलेया प्रकरणी वाळूज पोलिसांनी मोसीन बशीर शेख, बशीर अजीज शेख दोघेही रा. पंढरपुर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news