कन्नड; पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील भिलदरी येथे बालविवाहाची तयारी सुरू असून २२ डिसेंबरला हा बालविवाह होणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार सोमवारी (दि.१८) सहाय्यक पोलीस निरीक्षक देविदास वाघमोडे, बीट अंमलदार विलास सोनवणे, गजानन कन्हाळे यांनी भिलदरी येथे जाऊन हा बालविवाह रोखला.
अल्पवयीन मुलगी आपल्या आई -वडिलांसह कल्याण मुंबई येथे राहते. तिच्या वडीलांची मावशी भिलदरी येथे राहते. डोंगरगाव येथील एका मुलाबरोबर या अल्पवयीन मुलीचा विवाह ठरविण्यात आला. हा बालविवाह २२ डिसेंबरला होणार होता. याची माहिती पिशोर पोलिसांना मिळताच पोलिसांना भिरदरी येथे भेट दिली. मुलीच्या आई- वडिलांची समजूत काढत हा बालविवाह रोखला. ही कारवाई पोलीस अधिक्षक मनिष कलवानिया, अपर पोलीस अधिक्षक सुनिल लांजेवार, उप विभागीय पोलीस अधिकारी विजयकुमार ठाकुरवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक देविदास वाघमोडे, बीट जमादार विलास सोनवणे, गजानन कन्हाळे, दत्तु लोखंडे, पोलीस पाटील दिलीप महेर यांनी केली.
हेही वाचा :