Sambhajinagar Crime | मैत्रिणीवर गोळीबार करणाऱ्या गुंडाची धिंड, बघण्यासाठी मोठी गर्दी जमली

किलेअर्क, कॅनॉट, बुढीलेन, टीव्ही सेंटर भागात हातकड्या घालून फिरविले
Sambhajinagar Crime
Sambhajinagar Crime | मैत्रिणीवर गोळीबार करणाऱ्या गुंडाची धिंड, बघण्यासाठी मोठी गर्दी जमली File Photo
Published on
Updated on

Police paraded the Criminal who shot his girlfriend, a large crowd gathered to watch

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा मैत्रिणीवर गोळी झाडल्यानंतर पोलिसांसमोर केसात हात फिरवत आणखी तिघींना गोळ्या घालतो अशी धमकी देणाऱ्या कुख्यात गुंड सय्यद फैजल एजाज ऊर्फ तेजा (२८, रा. किलेअर्क) याचे मुंडण करून पोलिसांनी किलेअर्क, कॅनॉट, बुढीलेन, टीव्ही सेंटर भागात बुधवारी (दि.१३) दुपारी धिंड काढली. या सर्व ठिकाणी त्याने दहशत माजवली होती तिथेच पोलिसांनी हातकड्या घालून रस्त्यावर फिरवत त्याची काढलेली वरात बघण्यासाठी मोठी गर्दी जमली होती.

Sambhajinagar Crime
Sambhajinagar Crime | पोलिसांचे लाड अन् गुन्हेगारांचा माज : न्यायालयाच्या आवारात सिगारेटचे कश

पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी गुन्हेगारांवर कडक कारवाईचे निर्देश दिल्याने पोलिस दल कामाला लागल्याचे दिसून येत आहे. बेगमपुरा पोलिस ठाण्याचे एपीआय सुनील लहाने, गुन्हे शाखेचे पीएसआय विशाल बोडखे, अंमलदार राजेश यदमळ, शाम आडे, बाळू लहरे, नवनाथ खांडेकर, विजय निकम, सोमकांत भालेराव यांच्या पथकाने तेजाची किलेअर्क भागात हातकड्या घालून रस्त्यावरून धिंड काढली. तेथून बुढीलेन भागात फिरविले.

पुढे कॅनॉट प्लेसला त्याची वरात काढली. त्यानंतर टीव्ही सेंटर भागातील जाधववाडी सिग्नलजवळ त्याने ज्या ठिकाणी रिक्षा चालकावर कोयत्याने हल्ला केला होता तिथे नेऊन छत्रपती संभाजी महाराज चौकापर्यंत रस्त्यावरून हातकड्या घालून फिरविले. विशेष म्हणजे त्या हल्ल्यानंतर देखील पीएसआय विशाल बोडखे यांनी त्याची तेव्हा देखील येथूनच धिंड काढली होती. दरम्यान, कुख्यात तेजा विरुद्ध १७ गंभीर गुन्हे दाखल आहेत. रिक्षाचालकावर कोयत्याने हल्ला केल्याच्या गुन्ह्यात हर्सल जेलमध्ये होता. २९ जुलैला तो बाहेर आला. त्यानंतर त्याने सोमवारी रात्री मैत्रीण राखी मुरमुरे हिच्या हातावर गोळी झाडून गंभीर जखमी केले होते. ते पिस्तूल गुन्हे शाखा आणि बेगमपुरा पोलिसांनी बुधवारी घराजवळून जप्त केले असल्याची माहिती पोलिस निरीक्षक मंगेश जगताप यांनी सांगितले.

Sambhajinagar Crime
Ration Shop : रेशन दुकानदारांना हवे क्विटलमागे तीनशे रुपये कमिशन, आंदोलनाचाही इशारा

पोलिसांनी तेजाची मस्ती जिरवली

1 तेजाला मंगळवारी न्यायालयात घेऊन जाताना त्याने पोलिसांसमोरच बाहेर आल्यानंतर आणखी तिघींना गोळी मारतो अशी केसात हात फिरवून माजोर्डी भाषा वापरून खुले आव्हान दिले होते. त्याची ही मस्ती पोलिसांनी बुधवारी चांगलीच जिरवली. तेजाचे अगोदर मुंडण केले. त्याची दाढी आणि मिशा देखील भादरण्यात आल्या. त्यानंतर त्याची धिंड काढली.

माजोरड्या तेजाची मान खाली

lo पोलिसांनी रस्त्यावरून धिंड काढली तेव्हा तो मान खाली घालून चालत होता. हातात हातकड्या, दोन पोलिसांच्या हातात दोरी होती. दांडे घेऊन पोलिस त्याला घेऊन जात होते. रस्त्याने येणारे-जाणारे त्याच्याकडे पाहत असताना तो खुत्रस देऊन बघत होता. सर्व ठिकाणी त्याची धिंड पाहण्यासाठी लोकांनी मोठी गर्दी केली होती. तेजाच्या धिंडची शहरात जोरदार चर्चा सुरू आहे.

रस्त्यावर बसला गुंड, गर्दीने काढले व्हिडिओ

पोलिसांची दोन वाहने सायरन वाजवीत वरातीच्या मागे मागे चालत होती. कॅनॉट प्लेसला धिंड काढली तेव्हा तेजाला रस्त्यावरून चालताही येत नव्हते. एकाजागी तो थेट रस्त्यावरच बसला. गर्दीतील 3 तरुणांनी त्याचे मोबाईलमध्ये फोटो आणि व्हिडिओ काढले. पोलिसांनी गुन्हेगारांची अशीच दहशत मोडत काढली पाहिजे, अशी चर्चा नागरिक करत होते. हा कोण गुंड आहे अशी विचारणादेखील तरुण करताना दिसले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news