Sambhajinagar Crime | पोलिसांचे लाड अन् गुन्हेगारांचा माज : न्यायालयाच्या आवारात सिगारेटचे कश

गुन्हेगारांच्या सोशल मीडिया खात्यांच्या तपासणीचे सायबर पोलिसांना आदेश
Sambhajinagar Crime | पोलिसांचे लाड अन् गुन्हेगारांचा माज : न्यायालयाच्या आवारात सिगारेटचे कश
पोलिसांचे लाड अन् गुन्हेगारांचा माज : न्यायालयाच्या आवारात सिगारेटचे कशFile Photo
Published on
Updated on

Criminals smoke cigarettes in court premises

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा सोशल मीडियावर गुन्हेगारांच्या प्रोफाइलवर गैंगस्टर, माफिया, डॉन असे हॅशटॅगसह रील, न्यायालय आणि जेलबाहेरचे व्हिडिओ व्हायरल केले जात असताना तेजाच्या साथीदाराने थेट न्यायालयाच्या आवारात सिगारेट ओढतानाचा व्हिडिओ समोर आला आहे. दरम्यान, पोलिस यंत्रणा करते काय असा सवाल करत दै. पुढारीने कुख्यात गुन्हेगार बनले पोलिसांची डोकेदुखी या मथळ्याखाली बुधवारी वृत्त प्रकाशित केले होते. त्यानंतर पोलिस दल कामाला लागले आहे. सायबर पोलिसांना सर्व गुन्हेगारांच्या सोशल मीडिया खात्यांची तपासणी करून कारवाईचे आदेश देण्यात आल्याची माहिती गुन्हे शाखेचे उपायुक्त रत्नाकर नवले यांनी बुधवारी (दि. १३) दिली.

Sambhajinagar Crime | पोलिसांचे लाड अन् गुन्हेगारांचा माज : न्यायालयाच्या आवारात सिगारेटचे कश
Sambhajinagar News : धार्मिक स्थळावरून हटविले ६५९१ भोंगे

शहरात कुख्यात जावेद ऊर्फ टिप्या, फैजल ऊर्फ तेजा, निशिकांत ऊर्फ बब्बी, पवन जैस्वाल, कुख्यात गुन्हेगार जमीर कैची यांच्यासह अन्य छोट्या मोठ्या गुन्हेगारांच्या टोळ्या सक्रिय आहेत. या गुन्हेगारांवर पोलिसांचा वचक राहिलेला नाही. गुन्हेगारांचे फॉलवर्स अधिक असून पोलिस घेऊन जाताना, न्यायालयात नेताना देखील व्हिडिओ काढून गुन्हेगार सोशल मीडियावर दहशत निर्माण करतात. जेलच्या बाहेर पडल्यानंतर रॅली, हारतुऱ्यांनी सत्कार केल्याच्या रील तर सर्रासपणे दिसून येत आहेत. दरम्यान, सायबर पोलिसांकडे कुख्यात ४० ते ५० गुन्हेगारांची यादी असून त्यांच्या सोशल मीडिया खात्यांची तपासणी करण्यात येत आहे. एक उपनिरीक्षक आणि ८ अंमलदार याच कामी लागेलले आहेत. दरम्यान, यापूर्वी देखील सोशल मीडियावर तलवार, पिस्तूल घेऊन फोटो, पोलिसांच्या वाहनावर पाय ठेऊन व्हिडिओ व्हायरल केल्याप्रकरणी पाच गुन्हे दाखल करण्यात आले असल्याची माहिती सायबर ठाण्याचे पोलिस निरीक्षक शिवचरण पांढरे यांनी दिली.

गुन्हेगारांचे लाड पुरविणाऱ्या पोलिसांचे काय ?

तेजाचाच एक साथीदार हातात हातकडी असताना चक्क न्यायालयाच्या आवारात हातात हातकडी अन् मित्राच्या खांद्यावर हात ठेवून चक्क सिगारेट ओढतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. अशा सराईत गुन्हेगारांचे पोलिसच लाड पुरवीत असल्याने यांची मस्ती आणखीच वाढली आहे. या पोलिसांवर देखील कारवाई होणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Sambhajinagar Crime | पोलिसांचे लाड अन् गुन्हेगारांचा माज : न्यायालयाच्या आवारात सिगारेटचे कश
Sambhajinagar Crime News : महिलेला जीवन संपविण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी पतीसह सहा जणांविरुद्ध गुन्हा
गुन्हेगारांवर शंभर टक्के वचक बसविण्यात येईल शहरातील गुन्हेगारांवर कडक कारवाया केल्या जात आहेत. काही दिवसांपूर्वीच दोन ते तीन एमपीडीएच्या कारवाया केल्या आहेत. गुन्हेगारांचे रेकॉर्ड तपासले जात आहे. गुन्हेगारांवर शंभर टक्के वचक बसविण्यात येईल. ते जास्तीत जास्त जेलमध्ये कसे राहतील हे बघू. एमपीडीए आणि मोक्काची कारवाई वाढविण्यात येईल. काही प्रस्ताव तयार केलेले आहेत. गुन्हे शाखेच्या देखील कारवाया यापुढे दिसून येतील.
-रत्नाकर नवले, डीसीपी, क्राईम ब्रँच

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news