Jayakwadi Dam : जायकवाडी धरणाचा पोलिस विभागाकडून आढावा

दुर्घटना रोखण्यासाठी पाटबंधारे विभागाला केल्या विविध सूचना
Jayakwadi Dam
Jayakwadi Dam : जायकवाडी धरणाचा पोलिस विभागाकडून आढावाfile photo
Published on
Updated on

Police Department Reviews Jayakwadi Dam

पैठण, पुढारी वृत्तसेवा : गेल्या काही दिवसांपासून पैठण येथील जायकवाडी धरण परिसरात पाण्यात बुडून मृत्यू होण्याच्या, आत्महत्या सारख्या गंभीर घटना वारंवार घडत असल्याने या परिसराची सोमवारी (दि.१) पोलिस निरीक्षक महादेव गोमारे यांनी पाहणी केली. दुर्घटना रोखण्यासाठी पाटबंधारे विभागाला सुरक्षा संदर्भात विविध सूचना दिल्या आहे.

Jayakwadi Dam
Paithan News | जायकवाडी धरणाचा विद्युत पुरवठा झाला सुरळीत...!

येथील जायकवाडी धरणात मुबलक पाणीसाठा असून धरण पाहण्यासाठी विविध भागातून मोठ्या प्रमाणावर दररोज पर्यटक येतात. यामध्ये काही पर्यटक थेट धरणाच्या पाण्यामध्ये उतरतात पाण्याचा कुठलाही अंदाज न घेता फोटो सेशन करतात. पाण्यामध्ये पोहण्यासाठी उतरतात. यामध्ये तरुणाचा समावेश अधिक असतो अशावेळी पाण्यात बुडवून मृत्यू होण्याच्या घटना घडल्या आहेत.

पोलिस अधीक्षक प्रकाश जाधव, अप्पर पोलिस अधीक्षक प्रशांत स्वामी, उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक महादेव गोमारे, गोपनीय शाखेची लक्ष्मण पुरी, नरेंद्र अंधारे, शुभम पाटील यांनी सोमवारी नाथसागर धरण परिसरात सुरक्षाची पाहणी करून आढावा घेतला.

Jayakwadi Dam
Latur Crime : १ कोटी विम्यासाठी लिफ्ट दिलेल्या व्यक्तीला जाळून ‘स्वत:’च्या मृत्यूचा केला बनाव, खुनी थराराने लातूर हादरले

कुंभमेळा काळात गर्दी वाढणार

पोलिस निरीक्षक महादेव गोमारे यांनी सूचना देताना सांगितले की शासकीय स्तरावर कुंभमेळ्याची तयारी सुरु आहे. पैठण येथे कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर भाविक व साधुसंतांची मोठी गर्दी होणार असल्यामुळे पाटबंधारे विभागाने धरण परिसरात खबरदारीचा उपाय म्हणून सुरक्षा यंत्रणा अधिक कडक करणे आवश्यक आहे.. धरण परिसरात येणाऱ्या प्रवेशद्वारावर पर्यटक, नागरिक, भाविकांची ओळख पडताळणी होण्यासाठी वैशिष्ट्य स्वरूपाचे सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची सांगितले

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news