Sambhajinagar Crime : जिथे मस्ती, तिथेच उतरवला माज : गुंड टिप्या, टवाळखोर समीर अन् ड्रग्स तस्कर नियाजची धिंड

शहरात कुख्यात गुन्हेगार, गुंड, ड्रग्स तस्कर, मुलींची छेड काढणान्या टवाळखोरांवर पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी कठोर भूमिका घेतली आहे.
Sambhajinagar Crime
Sambhajinagar Crime : जिथे मस्ती, तिथेच उतरवला माज : गुंड टिप्या, टवाळखोर समीर अन् ड्रग्स तस्कर नियाजची धिंड File Photo
Published on
Updated on

Police Commissioner Praveen Pawar has taken a tough stance against notorious criminals, goons, and drug smugglers in the city.

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा शहरात कुख्यात गुन्हेगार, गुंड, ड्रग्स तस्कर, मुलींची छेड काढणान्या टवाळखोरांवर पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी कठोर भूमिका घेतली आहे. या गुन्हेगारांची दहशत मोडीत काढण्यासाठी शहर पोलिसांनी बिड पॅटर्न सुरू केला आहे. हकक्ष्या घालून, अनवाणी पाय, येथेच्छ धुलाई करून गुन् हेगारांना रस्त्यावरून फिरविले जात आहे, ज्या भागात मस्ती केली, तिथेच माज उतरविला जात असल्याने गुन्हेगारांमध्ये दहशत निर्माण झाली आहे.

Sambhajinagar Crime
आदर्श शिक्षक पुरस्कार : सभागृहात टाळ्याः बाहेर लाथाबुक्की!

गुंड टिप्याची पुंडलिकनगरच्या रस्त्यावरून फरपटत धिंड

कुख्यात गुंड टिप्या ऊर्फ जावेद शेखने जेलमधून सुटताच एका व्यावसायिकाला महिनाभरापूर्वी तलवार लावून दोन लाख लुटले होते. त्यानंतर तो पसार झाला, पण टोळीतील चौघे गजाआड गेले. इकडे पोलिसांनी कुख्यात तेजाची टक्कल करून धिंड काढल्याचे कळताच टिप्या बेट न्यायालयात शरण आला, मंगळवारी पुंडलिकनगर पोलिसांनी त्याची कस्टडी मेतली. मोपेड जप्त केल्यानंतर गुरुवारी घरापर्यंत तर शुक्रवारी थेट पुंडलिकनगरच्या रस्त्यावरून धुलाई केल्यानंतर फरपटत नेत धिंड काढली.

हनुमाननगरच्या कमानीजवळ गाडीतून उतरताच टिप्या थेट रस्त्यावर झोपला. तो चालायला तयार नव्हता. त्याला पोलिस निरीक्षक अशोक भंडारे, एपीआय शिवप्रसाद कन्हाळे, उपनिरीक्षक विनोद भालेराव, रेशीम कोळेकर यांच्या पथकाने त्याला काही अंतरावर उचलून फरपटत नेत उभे केले. ज्या भागात माज केला तिथेच लोक रस्त्याने टिप्याचा माज पोलिस कसे उत्तरचीत आहेत हे बघण्यासाठी मोठी गर्दी केली होती. टिप्या लोकांना आणि पोलिसांना खुजस देत होता. तो स्वतः रस्त्यावरून चालण्यास तयार नसल्याने प्लडून, उत्चलून, फरपटत पोलिस घेऊन जात असल्याचे पाहून नागरिकांनी त्याचे विडिओ शुट केले.

Sambhajinagar Crime
Children Vaccination : रुबेलाच्या नियंत्रणासाठी मनपाकडून लसीकरण

मुलींना छेडणाऱ्या स्पोर्टबाईकस्वार समीरला एमजीएममध्ये हातकड्या घालून फिरविले

कॉलेज परिसरात महागड्या स्पोर्टबाईकवर येऊन रेस करत रस्त्याने जाणाऱ्या मुलींना घाबरून त्यांची छेड काढल्याचे व्हिडिओ शूट करून व्यवरल करणारा टवाळखोर शेख समीर शेख सलीम याची सिडको पोलिसांनी एमजीएम कॉलेज व परिसरात हातकड्या घालून धिंड काढून त्याचा माज उत्तरविला. पोलिस निरीक्षक कुंदनकुमार वाघमारे, दामिनी पथकाच्या कांचन मिरधे, पीएसआय निवृत्ती गायके सुभाष शेवाळे यांच्यासह पोलिस पथकाने ★ समीरला कॉलेजमधून फिरवीत घटनास्थळ पंचनामा केला.

ड्रग्स तस्कर नियाजची हातकड्या घालून धिंड

दंगलीच्या गुन्ह्यातील आरोपी शेख नियाज शेख नजीर याच्या घरात एनडीपीएसच्या पोलिस निरीक्षक गीता बागवडे यांनी पथकासह छापा मारून रविवारी ड्रग्स, गावठी कट्टा, अघोरी विद्येचे साहित्य जात केले होते. त्याला जिन्सी पोलिसांच्या स्वाधीन केल्यानंतर शुक्रवारी नियाजची दहशत असलेल्या चंपा चौक, कटकटगेट भागात हातकडचा घालून एपीआय गौतम व्हावळे यांच्या पथकाने धिंड काढली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news