पेटोल पंप चालक वाहनधारकांच्या प्रतीक्षेत

गर्दी ओसरल्याने शुकशुकाट, शहरात इंधनाचा मुबलक साठा
sambhajinagar news
पेटोल पंप चालक वाहनधारकांच्या प्रतीक्षेतfile photo
Published on
Updated on

Petrol pump driver waiting for motorists

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा :

तीन दिवसांच्या गर्दीनंतर शहरातील पेट्रोल पंपांवरील चित्र पूर्णपणे पालटले आहे. रविवारी शहरातील सर्वच पेट्रोल पंपांवर शुकशुकाट दिसून आला. पेट्रोल डिझेल भरण्यासाठी वाहनचालकच येत नसल्याने पंप चालक वाहनधारकांच्या प्रतिक्षेत असल्याचे दिसून आले.

sambhajinagar news
Petrol and Diesel : संभाजीनगरात दुचाकींना दोनशेचेच मिळणार पेट्रोल

लॉकडाऊन लागण्याच्या अफवांमुळे तीन दिवसांपूर्वी अचानक पेट्रोल पंपांवर वाहनधारकांच्या लांबच लांब रांगा लागल्या. वाहनधारक टाक्या फुल्ल करून घेत होते. त्यामुळे अनेक पेट्रोल पंपांवरील साठा संपून ते कोरडे पडले. परिणामी ज्या पंपांवर साठा उपलब्ध आहे, तिथेही गर्दी वाढली होती. प्रशासनाने खबरदारी म्हणून दुचाकीत दोनशे रुपयांपर्यंत आणि चारचाकीत दोन हजार रुपयांपर्यंत इंधन भरण्याची मर्यादा घातली होती. शुक्रवारी हे निर्बंध उठविण्यात आले.

शनिवारी जवळपास सर्व पंपांवर पुरेसा साठा उपलब्ध झाला. त्यानंतर हळूहळू पेट्रोल पंपांवरील वाहनधारकांची गर्दीही ओसरली. रविवारी तर सर्व पेट्रोल पंपांवर शुकशुकाट दिसून आला. वाहनधारकांनी तीन दिवस रांगा लावून टाक्या फुल्ल केल्याने आता पेट्रोल पंपावर कोणीही फिरकत नसल्याचे चित्र आहे. परिणामी रविवारी पंपावरील कर्मचारी ग्राहकांच्या प्रतिक्षेत असल्याचे दिसून आले.

sambhajinagar news
पेट्रोल पंपांवरील गर्दी ओसरली

जिल्ह्यात ३६३ पेट्रोल पंप

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात एकूण ३६३ पेट्रोल पंप आहेत. तर छत्रपती संभाजीनगर शहरातील पंपांची संख्या ही ४९ इतकी आहे. शहरातील एक दोन पंप वगळता सर्वच पंपांवर रविवारी पेट्रोल डिझेलचा मुबलक साठा उपलब्ध होता. परंतु ते भरण्यासाठी वाहनधारकच येत नव्हते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news