Rickshaw Permits : नशेखोर रिक्षाचालकांचे परमिट होणार रद्द

पोलिस आयुक्तांच्या सूचनेला आरटीओंकडून सकारात्मक प्रतिसाद; संयुक्त तपासणी मोहीम सुरू
Rickshaw Permits
Rickshaw Permits : नशेखोर रिक्षाचालकांचे परमिट होणार रद्दFile Photo
Published on
Updated on

Permits of drunk rickshaw drivers will be cancelled

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा :

वाहतूक पोलिसांनी दोन दिवस तपासणी मोहीम राबविली त्यात २० रिक्षाचालक नशेत तर्रर्र असल्याचे आढळून आले होते. त्यामुळे नशेख -ोर रिक्षाचालकांचे परवाने रद्द करा अशी सूचना पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी आरटीओ विभागाला केली होती. त्याला प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय काठोळे यांनीदेखील सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.

Rickshaw Permits
Chhatrapati Sambhajinagar Political News : जिल्हा परिषदेवर आता काँग्रेसच्या 'हाता'ला यश मिळणे कठीण

तसेच दोन्ही विभागांकडून रिक्षाचालकांच्या तपासणीसाठी दिवस-रात्र संयुक्त कारवाई सुरू करण्यात आली आहे. पोलिस आयुक्तांच्या दालनात गुरुवारी (दि.१२) झालेल्या बैठकीला सहायक आरटीओ राजकुमार कुमथळे, सहायक पोलिस आयुक्त धनंजय पाटील आदी उपस्थित होते.

शहरात रिक्षाचालकांकडून प्रवाशांवर हल्ले, बेशिस्तपणा, गुन्हेगारी कृत्यात सहभाग, नशेखोरी करणाऱ्या चालकांची संख्या वाढत चालली आहे. महिलेचा विनयभंग, प्रवाशांशी अंगलट असे प्रकार घडत असल्याने रिक्षाने प्रवास करण्यास महिला लवकर धजावत नसल्याचे दिसून येत आहे.

Rickshaw Permits
Chhatrapati Sambhajinagar News : जि.प. निवडणुकीची तयारी सुरू, गट, गण रचनेचा कार्यक्रम जाहीर

वाहतूक पोलिसांकडून वारंवार दंडात्मक कारवाया केल्या जातात. मात्र, आरटीओ विभागाकडून याकडे कानाडोळा केला जातो. परवाना, बॅच, गणवेश आदी नियमानुसार रिक्षा चालविणाऱ्यांची संख्या बोटावर मोजण्याएवढी आहे. परमिट एकाचे आणि रिक्षा चालवितो तिसराच असे देखील प्रकार हल्ली वाढले आहेत. छावणी भागात तर एका रिक्षाचालकाने प्रवाशावर थेट चाकूहल्ला करून खून केला.

या गंभीर प्रकारची पोलिस आयुक्तांनी गंभीर दखल घेत वाहतूक शाखेला नशेखोर रिक्षाचालकांना शोधून कारवाईचे आदेश दिले होते. बुधवारी सहायक पोलिस आयुक्त धनंजय पाटील यांच्या नेतृत्वात सर्व पाच वाहतूक शाखेचे अधिकारी, कर्मचारी, सर्व ठाण्याचे प्रभारीदेखील रस्त्यावर उतरले होते. नियमबाह्य १४६ रिक्षाचालकाना १ लाख ८० हजारांचा दंड लावला. तर ४०२ जणांची ब्रेथ अनालायझरचे तपासणी केली त्यात २० चालक दारुच्या नशेत धुंद असल्याचे आढळून आले. पोलिसांनी त्यांच्या रिक्षा जप्त केल्या. गुरुवारीद खील पाच रिक्षा जप्त करण्यात आल्याचे पाटील यांनी सांगितले.

क्यूआर कोड मोहीम बारगळली

महिला, मुली, प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने रिक्षामध्ये दर्शनी भागात परमिटधारक, रिक्षाचालक यांचे नाव, फोटो, पत्ता, मोबाईल क्रमांक अशी सविस्तर माहिती असणारे क्यूआर कोड लावण्याची मोहीम आरटीओ विभागाने सुरू केली होती. मात्र, मध्यंतरी ही मोहीम बारगळली. परवाना नूतनीकरण करण्यापुरते क्यूआर कोड लावले जातात नंतर ते काढून रिक्षा रस्त्यावर धावत असल्याचे दिसून येते.

परवाने रद्द करण्याच्या सूचना दिल्या

काही गुन्हेगारी कृत्यात रिक्षाचालक सहभागी असल्याचे समोर आल्याने सरसकट तपासणी मोहीम वाहतूक शाखेकडून सुरू केली आहे. आरटीओ विभागाशी चर्चा केली. त्याचे दोन अधिकारी संयुक्तपणे कारवाईत सहभागी राहतील. नियमबाह्यपणे रिक्षा चालविणे, प्रवाशांशी गैरवर्तन, बेशिस्तपणा, नशेखोरी अजिबात खपवून घेतली जाणार नाही. यापुढे परवाने रद्द करा किंवा रिक्षाचे परमिट नूतनीकरण करू नका अशा सूचना आरटीओला दिल्या आहेत.
- प्रवीण पवार, पोलिस आयुक्त

कडक कारवाई करणार

ड्रंक अँड ड्राईव्ह रिक्षाचालकांवर धडक कारवाई सुरू केली आहे. रात्री वाहतूक पोलिसांसोबत संयुक्त कारवाईसाठी एक अधिकारी तर दिवसा आरटीओचा एक अधिकारी स्वतंत्रपणे कारवाई करत आहे. यामध्ये विना परवाना, विना बॅच आणि नियमबाह्यपणे रिक्षा चालविणाऱ्या चालकांवर कारवाई सुरू केली आहे. उद्धट, गुन्हेगारी प्रवृत्तीचे चालक आढळून आल्यास प्रसंगी त्यांचा रिक्षाचा परवानाही रद्द करण्यात येईल.
प्रादेशिक परिवहन अधिकारी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news