

Now it is difficult for the 'hand' of Congress to succeed in Zilla Parishad
शुभम चव्हाण
छत्रपती संभाजीनगर: जिल्हा परिषदेच्या २०१७ मध्ये झालेल्या निवडणुकीत शिवसेनेच्या साथीने भाजपच्या तोंडचा घास हिरावणाऱ्या काँग्रेसपुढे आगामी निवडणुकीत परिस्थिती आव्हानात्मक आहे. अब्दुल सत्तारांसारख्या मोठ्या नेत्यांसह तत्कालीन अनेक विजयी उमेदवारांनी पक्षाला ठोकलेला रामराम, शिवसेना-राष्ट्रवादीत फूट आणि पक्षांतर्गत गटबाजीमुळे यावेळी काँग्रेसच्या महाताफ्ला सत्त्-ोची खुर्ची मिळवणे कठीण असल्याचे बोलले जात आहे.
२०१७ मध्ये जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपने सर्वाधिक २३ जागांवर विजय मिळवत सत्ता स्थापनेचा दावा केला होता. पण काँग्रेसचे तत्कालीन जिल्हाध्यक्ष अब्दुल सत्तार यांनी जोरदार राजकीय खेळी करत शिवसेनेच्या मदतीने भाजपचा डाव उधळून लावला. त्यातून अध्यक्षपद शिवसे नेकडे गेलं, तर उपाध्यक्ष आणि सभापतीपद काँग्रेसकडे राखण्यात आलं. मात्र, यंदा काँग्रेससाठी स्थिती फारशी अनुकूल दिसत नाही.
भाजपने शिंदेसेना आणि राष्ट्रवादीची जुळवलेली मोट, महाविकास आघाडीतील मित्रपक्ष शिवसेना-राष्ट्रवादीमधील फूट आणि काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजीमुळे काँग्रेसची सत्तेची खुर्ची दुरावत असल्याचेही चर्चा जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात आहे. विशेषतः सत्ताधारी शिवसेना आता दोन भागांत विभागली आहे आणि ज्यांच्यासोबत काँग्रेसने युती करून सत्ता मिळवली होती, तेच आज वेगळ्या वाटेवर आहेत.
याउलट, महायुतीतील भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी यांनी महानगरपालिकेच्या निवडणुकांसोबत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी जोरदार तयारी केली आहे. त्यामुळे आगामी निवडणूकीत काँग्रेसला जिल्हा परिषेवर सत्ता टिकवण्यासाठी तारे वरची कसरत करावी लागणार, असल्याचेही बोलले जात आहे.
जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या ६२ गट व पंचायत समितीच्या १२४ गणांत एकूण १८६ सदस्य आहेत. तत्कालीन २०१७ च्या निवडणुकीत जिल्हा परिषदेतील ६२ गटात भाजप २३, शिवसेना १८, काँग्रेस १६, राष्ट्रवादी ३, मनसे १, तर (आरपीआय) डेमोक्रेटिक पक्षाचा एका उमेदवारांनी विजयी मिळवला होता.
विधानसभा निवडणुकीत राज्यात महायुतीला जनतेने स्पष्ट बहुमत दिले. यात जिल्ह्याचा विचार केला तर नऊ पैकी नऊ जागांवर महायुतीचे उमेदवार निवडून आले. त्यामुळे आगामी काळातील सर्वच निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीला जोर लावला लागणार आहे. मात्र लोकसभा-विधानसभा जरी एकत्रित लढवल्या तरी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत सगळ्याच पक्षांचा एकाला चलो रे चा नारा असेल, असे मत राजकीय अभ्यासकांडून व्यक्त करण्यात येत आहे.