

Pedeco to prepare DPR for road development
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : महापालिकेकडून शहरातील वाहतुकीचा नवा आराखडा तयार करण्यात येणार असून, शासकीय प्रकल्पांवर काम करणारी नामांकित संस्था पेडेको शहरातील रस्त्यांचा सखोल अभ्यास करून सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करणार आहे. हा अहवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर सादर केला जाणार असून, त्यानंतर रस्ते विकासासाठी निधीची मागणी करण्यात येणार आहे.
शहरातील वाढती लोकसंख्या, दिवसेंदिवस वाढणारी वाहनांच्या संख्येमुळे निर्माण होणारी वाहतूक कोंडी ही समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. यावर तोडगा म्हणून महापालिकेने आता शास्त्रशुद्ध मार्ग अवलंबण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, महापालिकेने मागील काही महिन्यांत रस्ता रुंदीकरण मोहिमेअंतर्गत आठ महत्त्वाच्या रस्त्यांवरील अतिक्रमणे हटवून सुमारे पाच हजारांवर बांधकामे पाडली.
त्यानंतर रस्त्यांची कामे तातडीने सुरू होतील, अशी नागरिकांना अपेक्षा होती. मात्र याकामासाठी निधी व डीपीआरची प्रक्रिया प्रलंबित राहिल्याने कामे थांबली आहेत. दरम्यान, पेडेको संस्थेला वाहतुकीच्या घनतेचा अभ्यास करण्याची जबाबदारी दिली आहे. महावीर चौकातून पुणे, मुंबई महामार्गाकडे जाणारी वाहने, जालना रस्ता, पैठण रस्ता यासह प्रमुख मार्गांवर दिवसभरात किती वाहने फिरतात याची मोजदाद केली जाणार आहे. या माहितीच्या आधारे रस्ते विस्तार, उड्नुणपूल किंवा पर्यायी मार्गांची गरज ओळखून अहवाल तयार करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासक जी. श्रीकांत यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
या डीपीआरमुळे शहरातील रस्ते विकासाला योग्य दिशा मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. केवळ रस्ते रुंदीकरण नव्हे, तर शहराच्या भविष्यातील वाहतूक व्यवस्थेचा संपूर्ण आराखडा यातून समोर येणार आहे. नागरिकांच्या अपेक्षेनुसार ही प्रक्रिया लवकर पूर्ण होऊन निधी मंजूर झाल्यास, शहर वाहतूक कोंडीमुक्त आणि सुकर प्रवासमार्ग लाभण्याची शक्यता वर्तवण्यात येत