Crime News : मुलाचा ताबा हवा असेल तर २० लाख रुपये द्या; मारहाण करत दागिने लुटले

सासरच्या मंडळींनी थेट पोलिस कॉलनीत घुसून जावयावर चाकू आणि लोखंडी रॉडने प्राणघातक हल्ला केला.
Crime News
Crime NewsPudhari
Published on
Updated on

Pay ₹20 lakh if ​​you want custody of the son; jewelry looted after assault

छत्रपती संभाजीनगर : मुलाचा ताबा आणि दाखल केलेला गुन्हा मागे घेण्यासाठी २० लाख रुपयांची मागणी करत सासरच्या मंडळींनी थेट पोलिस कॉलनीत घुसून जावयावर चाकू आणि लोखंडी रॉडने प्राणघातक हल्ला केला.

Crime News
Robbery Case : शहरात भुरट्या चोरांचा सुळसुळाट; घरफोडी, लुटमारीच्या चार घटना

तसेच, मारहाण करून कपाटातील १६ ग्रॅमचे सोन्याचे दागिनेही लुटून नेले. ही धक्कादायक घटना गुरुवारी (दि. ४) दुपारी मिलकॉर्नर येथील पोलिस वसाहतीत घडली. याप्रकरणी बेगमपुरा पोलिस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिस कर्मचारी समीर शेख (३४) यांच्या पत्नीचे निधन झाले असून त्यांचा साडेतीन वर्षांचा मुलगा नाशिकला सासूकडे होता. समीर यांनी त्याला सोबत आणल्याने सासरच्यांनी २० लाखांची मागणी सुरू केली.

Crime News
Waluj theft case : महिलेच्या धाडसाने मंगळसूत्र चोरटा अटकेत

गुरुवारी दुपारी साला राज शेख, सासू नाजमीन, आजे सासरे इक्बाल शेख यांच्यासह पाच जणांनी समीर यांच्या घरात घुसून चाकू आणि रॉडने हल्ला केला. मध्यस्थी करणाऱ्या समीर यांच्या आईलाही मारहाण करून आरोपींनी दागिने लुटून पोबारा केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news