ST Bus smart card : एसटीच्या स्मार्ट कार्डवरील चुकांचा प्रवाशांना भुर्दंड

अधिकाऱ्यांचे एजन्सीधारकांकडे बोट : एजन्सीधारकांचा तक्रार केल्याचा जप
ST Bus smart card
ST Bus smart card : एसटीच्या स्मार्ट कार्डवरील चुकांचा प्रवाशांना भुर्दंडfile photo
Published on
Updated on

Passengers are shocked by errors on ST's smart cards

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : एसटीने सवलतधारकांसाठी एनसीएमसी (स्मार्ट कार्ड) लागू केले आहे. या कार्डवर पुरुषांच्या कार्डवर महिलांची वर्गवारी तर महिलांच्या कार्डवर मुलांचा फोटो अशा अनेक चुका आहेत. याचा भुर्दंड मात्र प्रवाशांना सहन करावा लागत आहे. या चुकांबाबत अधिकारी एजन्सीधारकांकडे बोट दाखवत आहेत. तर एजन्सीधारक संबंधित कंपनीकडे तक्रार केल्याचा जप करत आहे. यात मात्र प्रवासी पिसला जात आहे.

ST Bus smart card
Illegal sand extraction : गोदावरी नदीतून अवैधरीत्या वाळू उपसा; १० लाखांचा मुद्देमाल जप्त

१ सप्टेंबर पासून सवलतधारक प्रवाशांना हे कार्ड बंनकारक करण्यात आले आहे. दरम्यान यातील काही तांत्रिक अडचणीमुळे १४ सप्टेंबर कार्ड बंधनकारक नाही असे असले तरी ज्यांच्याकडे कार्ड उपलब्ध आहे अशांना मात्र कार्डाच्या माध्यमांतूनच तिकीट देण्यात येत आहे. अशावेळी काही पुरूषांच्या कार्डावर महिला संवर्गाची नोंद असल्याने त्यांना पुर्ण तिकीट काढून प्रवास करावा लागत आहे.

तर काही महिलाच्या कार्डवर मुलाचा फोटो असल्याने त्यांनाही पूर्ण तिकीट काढूनच प्रवास करावा लागत आहे. या बाबत अधिकारी व एजन्सीधारक समाधानकारक उत्तर देण्यास तयार नाहीत. यात मात्र प्रवासी आणि वाहक यांच्यात वाद होण्याची परस्थिती निर्माण झाली आहे.

ST Bus smart card
Sale of narcotics pills : स्ट्रीप न ठेवता खिशात सुट्या बटन गोळ्या ठेऊन नशेखोराना विक्री

एन्सीधारकांचा तक्रार केल्याचा जप

एसटी महामंडळाने एमसीएनसी कार्ड बनवण्याची जबाबदारी मे. इबिक्स टेक्नॉजॉजी लि. कंपनीकडे सोपवली आहे. ही कंपनी राज्याभर एजन्सीधारक नेमून कार्डसाठी सवलतधारकांची नोंदणी करून घेत आहे. या नोंदीनुसार कार्ड बनवून देत आहे. दरम्यान नोंदीदरम्यान किंवा इतर वेळी होणाऱ्या चुकांत दुरुस्ती किंवा इतर बदल कोण करणार या बाबत स्पष्टता नाही. अनेक कार्डवर संवर्गात मोठ्या प्रमाणात चुका आहेत. याबाबत एजन्सीधाक म्हणतात कंपनीकडे तक्रार केली आहे. परंतु त्यावर अद्याप काहीच उपाययोजना करण्यात आल्या नाहीत.

अधिकाऱ्यांचे एजन्सीधारकांकडे बोट

कार्डवरील चुका ही आमची जबाबदारी नसून एजन्सीधारकांची असल्याचे सांगत ते एजन्सीधारकांकडे बोट दाखवत आहेत. असे असले तरी प्रवासी मात्र एसटीचे आहेत. याकडे अधिकारी पूर्णपणे दुर्लक्ष करत आहेत. एसटीच्या प्रवाशांना होणाऱ्या असुविधेचा विचार कोणीच करत नसल्याने या सर्व चुकांना भुर्दंड सध्या तरी प्रवाशांना सहन करावा लागत असल्याने मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news