Sale of narcotics pills : स्ट्रीप न ठेवता खिशात सुट्या बटन गोळ्या ठेऊन नशेखोराना विक्री

किराडपुऱ्यात जिन्सी पोलिसांनी आरोपीला ठोकल्या बेड्या, ८० गोळ्या जप्त
Sambhajinagar Crime News
Sale of narcotics pills : स्ट्रीप न ठेवता खिशात सुट्या बटन गोळ्या ठेऊन नशेखोराना विक्रीFile Photo
Published on
Updated on

Loose pills are being kept in pockets—without their blister packs—and sold to drug addicts

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : पोलिसांना चकवा देण्यासाठी नशेच्या गोळ्यांची स्ट्रीप फोडून सुट्या गोळ्या खिशात ठेऊन विक्री पेडलरला जिन्सी पोलिसांनी किराडपुरा भागातून बेड्या ठोकल्या. अतीक खान शफीक खान (४०, रा. गल्ली क्र. १५, शरीफ कॉलनी, किराडपुरा) असे आरोपीचे नाव असल्याची माहिती पोलिस निरीक्षक गणेश ताटे यांनी दिली.

Sambhajinagar Crime News
Rangin Darwaza : रंगीन दरवाजा होतोय बेरंग

आरोपी अतीक खान हा नशेसाठी वापरल्या जाणाऱ्या निट्रोसन १० नावाच्या गोळ्यांची विक्री करत असल्याची माहिती जिन्सी पोलिसांना मिळाली होती. त्यावरून जिन्सी पोलिसांनी ५ सप्टेंबर रोजी रात्री अन्न व औषध प्रशासनाचे मनोज पैठणे यांना घेऊन आरोपीच्या घरावर छापा टाकला. घर झडतीत ८० गोळ्या (८ स्ट्रीप) आणि एक स्मार्टफोन असा एकूण ४२ हजार रुपयांचा मुद्देमाल मिळून आला.

पोलिसांच्या तावडीत सापडू नये यासाठी अतिक गोळ्या स्ट्रीपमधून काढून केवळ पांढऱ्या रंगाच्या गोळ्या आपल्या खिशात ठेवत असे. जेणेकरून कोणालाही त्या अंमली गोळ्या असल्याचा संशय येऊ नये आणि तपासणीत त्या सहजासहजी लक्षात येऊ नयेत. मात्र, पोलिसांच्या अचूक माहितीमुळे त्याचा हा डाव फसला.

Sambhajinagar Crime News
Illegal sand extraction : गोदावरी नदीतून अवैधरीत्या वाळू उपसा; १० लाखांचा मुद्देमाल जप्त

याप्रकरणी जिन्सी ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलिस आयुक्त प्रवीण पवार, परिमंडळ २ चे पोलिस उपायुक्त रत्नाकर नवले यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक गणेश ताटे, सहायक निरीक्षक सर्जेराव सानप, संदीप सानप, अमोल काकडे, सोहेल पठाण, अजहर शेख, गोरखनाथ राठोड, प्रियंका भिवसने यांच्या पथकाने केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news