Illegal sand extraction : गोदावरी नदीतून अवैधरीत्या वाळू उपसा; १० लाखांचा मुद्देमाल जप्त

crime news
गोदावरी नदीतून अवैधरीत्या वाळू उपसा; १० लाखांचा मुद्देमाल जप्तfile photo
Published on
Updated on

Illegal sand extraction from Godavari River; seized material worth ₹10 lakh

पैठण, पुढारी वृत्तसेवा पैठण तालुक्यातील हिरडपुरी येथे गोदावरी नदीतून रात्रीच्या वेळी मोठ्या प्रमाणावर वाळू उपसा व वाहतूक सुरू असल्याचे समोर आले आहे. पाचोड पोलिसांच्या पथकाने रविवारी (दि. ६) दोन ब्रास वाळूसह १० लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

crime news
Ganeshotsav 2026 : गणेशोत्सवात शेवटचे पाच दिवस रात्री १२ पर्यंत चालणार कार्यक्रम : पालकमंत्री

पारुंडी शिवारातील गट क्रमांक ७३ लगतच्या रस्त्यावरून अवैधरीत्या वाळू तस्करी करणारे राहुल गंगाराम कुऱ्हाडे, सोहेल अन्वर शेख आणि गौरव विनोद डुकळे हे विनाक्रमांकाच्या मिनी हायवामधून वाळूची वाहतूक करत असताना पोलिसांना आढळून आले. पाचोड पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक सचिन पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल साबळे, सानप आणि आयनले यांनी वाहनाची तपासणी केली.

crime news
Rangin Darwaza : रंगीन दरवाजा होतोय बेरंग

सदर वाळू वाहतूक करणारे वाहन गणेश भागाजी डुकळे यांच्या मालकीचे असून, संदीप छबुराव डुकळे यांच्या सांगण्यावरून हिरडपुरी येथील गोदावरी नदीतून अवैधरीत्या वाळूची वाहतूक केली जात असल्याची माहिती तपासात समोर आली. पाचोड पोलिसांनी पाच जणांविरुद्ध कारवाई करून दोन ब्रास वाळूसह मिनी हायवा असा एकूण १० लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news