Education News : अनुदानाच्या मागण्यांसाठी ७-८ जुलैला अंशतः अनुदानित शाळा बंद

शिक्षक समन्वय संघाची राज्यव्यापी आंदोलनाची हाक
Mumbai Aided School Teachers
Mumbai Aided School TeachersPudhari File Photo
Published on
Updated on

Partially aided schools to remain closed on July 7–8 over demands for grants

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा: अंशतः अनुदानित शाळांतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांवर शासनाचे लक्ष वेधण्यासाठी शिक्षक समन्वय संघाने ७ व ८ जुलै रोजी राज्यातील सर्व अंशतः अनुदानित शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या दोन दिवसांत राज्यभरातील हजारो शाळांमधील अध्यापनाचे कामकाज ठप्प राहणार असून, शिक्षकांनी मुंबईतील आझाद मैदानावरील आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन संघटनेने केले आहे.

Mumbai Aided School Teachers
ZP teacher promotion process : झेडपी शिक्षक पदोन्नती प्रक्रियेला हायकोर्टाचा 'ब्रेक'

संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, अनेक वर्षांपासून अनुदानासह विविध प्रलंबित मागण्यांसाठी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात येत आहे. मात्र, अद्याप ठोस निर्णय न झाल्याने शिक्षकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली असून, अखेर शाळा बंद आंदोलनाचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातील सर्व जिल्ह्यांतील अंशतः अनुदानित शाळांमधील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी व्हावे, तसेच प्रत्येक शाळेने सक्रिय सहभाग नोंदवून शासनापर्यंत आपल्या न्याय्य मागण्या पोहोचवाव्यात, असे आवाहन शिक्षक समन्वय संघाने केले आहे.

Mumbai Aided School Teachers
Parbhani School Protest | शाळेच्या पहिल्याच दिवशी पालकांचे आंदोलन; कोल्हा येथील शाळेला ठोकले कुलूप

शासनाने तातडीने सकारात्मक भूमिका घेऊन प्रलंबित प्रश्न निकाली काढावेत, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशाराही संघटनेने दिला आहे. छत्रपती संभाजीनगर कृती समितीचे रविंद्र तम्मेवार, सुरेखा शिंदे, प्रदीप विखे, वाहेद शेख, रमाकांत छडीदार, स्वप्नील जाधव, हरि मोहिते, संभाजी काळे आणि आदिनाथ अडसरे यांनी जिल्ह्यातील अंशतः अनुदानित शाळांतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना शाळा बंद आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news