Chandrashekhar Bawankule : पार्थ पवार यांना अद्याप क्लिनचिट नाही

अद्याप अहवालच नाही तर क्लिनचिटचा प्रश्नच येत नाही, असे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी गुरुवारी (दि. ५) छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.
Chandrashekhar Bawankule News
पार्थ पवार यांना अद्याप क्लिनचिट नाहीFile Photo
Published on
Updated on

Parth Pawar has not yet been given a clean chit Chandrashekhar Bawankule

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा :

पुण्यातील मुंढवा जमीन खरेदी प्रकरणात अद्याप पार्थ पवार यांना क्लिनचिट देण्यात आ-लेली नाही. प्रकरणाच्या चौकशीसाठी नियुक्त केलेल्या विकास या खारगे समितीला आठ दिवसांची मुदतवाढ दिली असून अंतिम अहवाल आठवडाभरात मिळणार आहे. अद्याप अहवालच नाही तर क्लिनचिटचा प्रश्नच येत नाही, असे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी गुरुवारी (दि. ५) छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले. त्यासोबतच दमानिया यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्द्यासह विविध राजकीय विषयांवर त्यांनी माहिती दिली.

Chandrashekhar Bawankule News
सिल्लोडला पोलिसांवर दगडफेक

पार्थ पवार प्रकरणाबाबत बोलताना बावनकुळे म्हणाले की, अद्याप कोणताही अहवाल सरकारकडे आलेला नाही. अहवालाच आला नसेल तर क्लिनचिट देण्याचा प्रश्नच येत नाही, असे सांगत मंत्री बावनकुळे म्हणाले या प्रकारणाच्या चौकशीसाठी नियुक्त केलेल्या विकास खारगे समितीने आठ दिवसांची मुदतवाढ मागितली होती.

त्यावर आजच मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे पुढील आठ दिवसांत अंतिम अहवाल माझ्याकडे येईल. त्यानंतर पुढील निर्णय घेण्यात येईल असेही मंत्री बावनकुळे म्हणाले. रोहित पवार यांच्या ट्विटवर प्रतिक्रिया देताना बावनकुळे म्हणाले की, पक्षासाठी जनतेचा पाठिंबा मागणे योग्यच आहे. काही ठिकाणी स्थानिक पातळीवर युती झाल्या आहेत. प्रचारादरम्यान अजितदादा यांच्या पक्षाबद्दल चुकीची वक्तव्ये करू नयेत, असे कार्यकर्त्यांना सांगितले आहे. भाजप परिवारालाही दुःख आहे.

Chandrashekhar Bawankule News
मंत्री शिरसाटांच्या हॉटेल खरेदीची फाईल उघडली

जि.प., पं.स. स्वीकृत सदस्य

स्वीकृत सदस्यांबाबत ते म्हणाले की, यासाठी अधिनियमात दुरुस्ती करावी लागेल. जिल्हा परिषद निवडणुकीत दहा सदस्यांमागे एक अधिस्वीकृत सदस्य आणि पंचायत समितीत पाच सदस्यांमागे एक अधिस्वीकृत सदस्य अशी तरतूद करण्याबाबत चर्चा झाली आहे.

येणाऱ्या सभागृहात याला मान्यता मिळण्याची शक्यता असून, ही तरतूद या निवडणुकीसाठी लागू राहील. मात्र, मनपाबाबत हे बदल लागू राहणार की नाही, यावर अद्याप चर्चा झालेली नाही. आरक्षणामुळे काही अभ्यासू लोक मागे राहतात, त्यामुळे त्यांना संधी दिली पाहिजे, असे त्यांनी नमूद केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news