मुख्याध्यापकांच्या केबिनमध्येच पालकाला बेदम मारहाण

मुलीची शाळेची फी भरण्यावरून झालेल्या किरकोळ वादाचे रूपांतर हाणामारीत झाले.
sambhajinagar crime news
मुख्याध्यापकांच्या केबिनमध्येच पालकाला बेदम मारहाणfile photo
Published on
Updated on

Parent brutally beaten up in principal's cabin

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा :

मुलीची शाळेची फी भरण्यावरून झालेल्या किरकोळ वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. ही घटना शनिवारी (दि.२८) दुपारी सेन्ट्रल नाका परिसरातील अल हिदायत पब्लिक स्कूलमध्ये घडली. शाळेतील महिला अकाउंटंट, तिचे नातेवाईक आणि इतर साथीदारांनी मिळून एका पालकाला मुख्याध्यापकांच्या केबिनमध्येच लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. एक महिला, तिचे वडील मुजाहेद अली, पती युसूफउद्दीन अन्सारी, भाऊ, दीर आणि तीन अनोळखी अशी आरोपींची नावे आहेत.

sambhajinagar crime news
Beed crime news | माता न तू वैरिणी: 'बाथरूमला जाते' सांगून पोटच्या दीड वर्षांच्या चिमुकलीला आईनेच सोडले बेवारस

फिर्यादी अब्दुल वाजीद गफुर डांगे (३७, रा. हुसेन कॉलनी, गारखेडा) हे दि. २८ मार्च रोजी दुपारी १२:३० च्या सुमारास आपल्या मुलीची शाळेची फी भरण्यासाठी अल हिदायत पब्लिक स्कूलमध्ये गेले होते. तेथे उपस्थित असलेल्या अकाउंटंट महिलेला त्यांनी फी भरून घेण्याची विनंती केली.

मात्र महिलेने तुमची मुलगी कोणत्या वर्गात शिकते हे मला माहीत नाही, मी क्लास टीचर नाही, असे म्हणत डांगे यांच्यावर आरडाओरड केली आणि केबिनचे लाईट बंद करून ती निघून गेली. या प्रकारानंतर डांगे यांनी मुख्याध्यापकांमार्फत फी भरली आणि ते घरी निघून गेले.

sambhajinagar crime news
MLA Namita Mundada : जिल्हा परिषद शाळेस गतवैभव मिळवून देणार

त्यानंतर दुपारी दोनच्या सुमारास महिलेच्या वडिलांनी डांगे यांना फोन करून चर्चेसाठी पुन्हा शाळेत बोलावले. डांगे जेव्हा मुख्याध्यापकांच्या केबिनमध्ये चर्चा करत होते, तेव्हा अचानक अकाउंटंट महिला, तिचे वडील मुजाहेद अली, पती युसूफुद्दीन अंसारी, तिचा भाऊ, दीर आणि तीन अनोळखी व्यक्तींनी केबिनमध्ये प्रवेश केला. या सर्वांनी डांगे यांचे हातपाय धरून त्यांना शिवीगाळ करत लाथा-बुक्क्यांनी व हाताने बेदम मारहाण केली. या हल्ल्यात डांगे बेशुद्ध पडले. या मारहाणीत त्यांच्या मानेला, डोळ्याला आणि पाठीला गंभीर दुखापत झाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news