

Paithan News The issue of Kurdwadi railway line along with the road remains unresolved
चंद्रकांत अंबिलवादे
पैठण : महाराष्ट्रातील संत परंपरेत सर्वात मोठा धार्मिक व पारंपरिक उत्सव पंढरपूर येथील विठ्ठल-रुक्माई आषाढी वारी सोहळ्यात वर्षानुवर्षे ऊन वाऱ्याची तमा न बाळगता पायी दिंडीद्वारे मोठ्या उत्साहात वारकरी सहभागी होतात, पालखी सोहळा मार्गावरील रस्त्यासह कुर्डवाडी रेल्वे रुळावर पूल उभारण्यात यावा, अशी मागणी अनेक वर्षापासून वारकऱ्यांची आहे.
भानुदास एकनाथ नामघोष करून पंडरीच्या वैष्णवांच्या मेळ्यात सहभाग होत असलेल्या व मानाचे स्थान प्राप्त शांतीब्रह्म श्रीसंत एकनाथ महाराज यांचा पालखी सो हळा आषाढी वारी सोहळ्यासाठी दि. १८ रोजी पैठण येथून पंढरीला जाण्यासाठी प्रस्थान करणार आहे मानाचे स्थान श्री संत एकनाथ महाराज यांच्या पहिल्याच चणकवाडी मुक्कामाची वाट अद्याप बिकटच आहे. या ठिकाणी वारकऱ्यांनी पायी दिंडी घेऊन कसे जायचे, असा प्रश्न आजही कायम आहे.
असलेल्या श्रीसंत ज्ञानेश्वर महाराज, निवृत्तीनाथ महाराज, तुकाराम महाराज, सोपानदेव महाराज, मुक्ताबाई महाराज, नामदेव महाराज, गजानन महाराज, चांगवटेश्वर महाराज इत्यादी संतांच्या पालखी सोहळा राज्यातील विविध पालखी मार्गावरून पायी दिंडी करतात. प्रत्येक विभागाचे विभागीय आयुक्त व संबंधित जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांच्या नियोजनातून वारकऱ्यांना प्रशासनाकडून मूलभूत सुविधा पुरविण्यासाठी आषाढी वारी एक महिना अगोदर पूर्वी नियोजन करण्याचे आदेशित करण्यात आलेले आहे.
पुणे, नाशिकसह सोलापूर, बीड, धाराशिव, अहिल्यानगर, बुलढाणा, मुक्ताईनगर येथील जिल्हा प्रशासनाने आषाढी वारीसाठी नियोजन बैठक घेतल्या. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून श्रीसंत एकनाथ महाराज या मानाच्या पालखीसह हजारो वारकरी पायी दिंडीत जातात. आरोग्यसह विविध सुविधा मिळवण्यासाठी वारीच्या तोंडावर प्रशासनाकडं नियोजन बैठकीसाठी झोली पसरण्याची वेळ दिंडी चालक वारकरी यांच्यावर आली होती. वारकऱ्यांचा रोष लक्षात घेता छत्रपती संभाजीनगर जिल्हा प्रशासनाने नियोजन बैठक घेतली, परंतु वर्षानुवर्षे प्रलंबित असलेल्या रस्त्याच्या समस्या आजही कायम आहे.
कुर्डवाडी (ता. माढा जि. सोलापूर) या भागातील कव्हेदड या ठिकाणी चौथा रिंगण सोहळा मोठ्या उत्साहात होतो. हा सोहळा पाहण्यासाठी पंचक्रोशीतील भाविक भक्त, वारकरी मोठ्या प्रमाणावर उपस्थित राहतात. रिंगण सोहळा संपन्न झाल्यानंतर नाथांचा पालखी सोहळा चौदाव्या मुक्कामासाठी महादेववाडी, शेळके वस्ती मार्गे कुई पंचक्रोशीत दाखल होतात. नाथांच्या पादुका रथ व पायी दिंडीतील वारकरी धोकादायक रेल्वे रूळ ओलांडून पोलिस बंदोबस्तात मार्गस्थ होतात. या परिसरात रेल्वे पूल निर्माण करण्यासाठी परिसरातील भाविक नागरिक व बारकऱ्यांनी टेंभुर्णी कुरूडवाडी महामार्गावर अनेक वेळेस रास्ता रोको आंदोलन केले होते. रेल्वे पूल पुढच्या वर्षी निर्माण होणार, असे गेल्या बारा वर्षांपासून स्थानिक प्रशासनाकडून आश्वासन दिले जाते. परंतु समस्या मात्र कायम आहे. पुन्हा एकदा वारकरी व गावकरी थेट रेल्वे रुळावर आंदोलन करण्याच्या पावित्र्यात आहेत.
श्रीसंत एकनाथ महाराज पालखी सोहळा मानाचा असून, या सोहळ्यात राज्यातील विविध भागांतील वारकरी सहभागी होतात. यामुळे दरवर्षी वारकऱ्यांच्या संख्येत वाढ होती. हा पालखी सोहळा छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, बीड, धाराशिव जिल्ह्यांतून मार्गस्थ होतो. प्रशासनाकडून मूलभूत सुविधा पुरविण्यासाठी संबंधित जिल्हा व पालखी स्त्यावरील स्थानिक प्रशासनाला वेळ नसल्याचा आरोप होत आहे. इतर पालखी सोहळ्याप्रमाणेच नाथांच्या पालखी सोहळ्याला सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात, अशी मागणी पालखी सो-हळा प्रमुख नाथवंशज रघुनाथबुवा गोसावी पालखीवाले यांनी केली