Sambhajinagar Crime : आई-बहिणीला शिवीगाळ करणाऱ्या भावाचा मोठ्या भावानेच केला खून

खाम जळगाव येथील तरुणाच्या खुनाचा २४ तासांत उलगडा
Chhatrapati Sambhajinagar Crime
Chhatrapati Sambhajinagar Crimepudhari photo
Published on: 
Updated on: 

लोहगाव :दारूच्या नशेत आई आणि बहिणींना शिवीगाळ करून त्रास देणाऱ्या सख्ख्या लहान भावाचा मोठ्या भावानेच लाकडी दांड्याने मारहाण करून खून केल्याची घटना पैठण तालुक्यातील खाम जळगाव शिवारात घडली. या खुनाचा बिडकीन पोलिसांनी अवघ्या २४ तासांत उलगडा केला. नवनाथ कान्हू एरंडे असे आरोपी भावाचे नाव असून, त्याला अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने त्याला २८ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी (दि. २५) सकाळी ९ वाजेच्या सुमारास खाम जळगाव शिवारातील गट क्रमांक ७३ मध्ये राहत्या घरासमोरील शेतात एका तरुणाचा मृतदेह आढळून आला. पोलिस निरीक्षक आर. एम. तडवी आणि पोलिस उपनिरीक्षक मनोज पाटील यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. मृताची ओळख श्रीराम कान्हू एरंडे (वय २६) अशी पटली. त्याच्या शरीरावर अनेक जखमा आढळल्याने फॉरेन्सिक पथकाला पाचारण करण्यात आले.

Chhatrapati Sambhajinagar Crime
Sambhajinagar Municipal Corporation Recruitment : मनपा भरती प्रक्रियेवर एमआयएमचा आक्षेप

पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी घाटी रुग्णालयात पाठविण्यात आला. अनेक जखमांमुळे मृत्यू झाल्याचा अभिप्राय वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिला. याप्रकरणी पोलिस उपनिरीक्षक मनोज पाटील यांच्या तक्रारीवरून अज्ञात व्यक्तीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस निरीक्षक आर. एम. तडवी यांनी तपास सुरू केला. तपासादरम्यान मृताचा सख्खा मोठा भाऊ नवनाथ याच्यावर संशय आल्याने त्याची चौकशी करण्यात आली.

श्रीराम हा नेहमी दारू पिऊन आई आणि बहिणींना शिवीगाळ करून त्रास देत असल्याचे तपासात समोर आले. मंगळवारी (दि. २४) रात्री ९.३० ते १० वाजेच्या सुमारास तो पुन्हा दारू पिऊन घरी आला आणि शिवीगाळ करू लागला. त्यामुळे संतापलेल्या नवनाथने लाकडी दांड्याने श्रीरामच्या डोक्यावर, हातापायांवर मारहाण केली. यात त्याचा मृत्यू झाल्याची कबुली आरोपीने दिल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी गुरुवारी (दि. २६) नवनाथला अटक केली असून, खुनासाठी वापरलेला लाकडी दांडा जप्त केला आहे.

Chhatrapati Sambhajinagar Crime
NCP Sharad Pawar: शरद पवारांची राष्ट्रवादी 'इंडिया' आघाडीतून बाहेर पडण्याच्या तयारीत? सुप्रिया सुळे बैठकीला अनुपस्थित राहणार

पोलिस पथकाची कामगिरी

ही कामगिरी पोलिस अधीक्षक प्रकाश जाधव, अपर पोलिस अधीक्षक प्रशांत स्वामी आणि पैठणच्या उपविभागीय पोलिस अधिकारी पूजा नागरे यांच्या मार्गदर्शनाखाली बिडकीन पोलिस ठाण्याचे प्रभारी पोलिस निरीक्षक आर. एम. तडवी, पोलिस उपनिरीक्षक मनोज पाटील, पोलिस अंमलदार संदीप धनधर, अमोल मगर, राजू चव्हाण आणि सतीश साळवे यांनी केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.