

Opportunities only for those who work in BJP: Minister Save
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा भारतीय जनता पक्ष देशातील सर्वात मोठा पक्ष आहे. देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी व महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सामान्य जनतेसाठी अनेक योजना राबवीत आहेत. या योजना जनतेपर्यंत पोहचवण्याचे काम प्रत्येकाने करायचे आहे, जो काम करेल, त्याला पक्षाकडून अनेक संधी मिळतील, असा कानमंत्र शनिवारी (दि. ५) शहर जिल्हाध्यक्ष किशोर शितोळे यांच्या अध्यक्षतेखाली भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्या कार्यकर्त्यांना ओबीसी कल्याणमंत्री अतुल सावे यांनी दिला.
यावेळी सरचिटणीस जालिंदर शेंडगे, शिवाजी दांडगे, लक्ष्मण शिंदे, संतोष पाटेकर, विजय प्रधान, कल्याण शिंदे, कपिल भालेराव, सुनील जगताप, विजय सोनवणे, विष्णू गायकवाड, दत्ता गाडे, विनोद पारडकर, भीमाशंकर कोरडे यांची प्रमुख उपस्थिती होती. सावे म्हणाले की, भाजपमध्ये काम करण्याची खूप मोठी संधी आहे.
मात्र, पक्ष कार्य करण्याकडे दुर्लक्ष होत असते. जो पक्षाचे प्रत्येक काम करेल, पक्ष त्याचा नक्कीच विचार करेल, याच कार्यकर्त्यांना पक्षाकडून नव्या संधी उपलब्ध होतील, असेही ते म्हणाले. तर देशात एकमेव भाजपच असा पक्ष आहे, जो काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना योग्य न्याय देतो. त्याचा योग्य सन्मान करतो.
इतर पक्षात घराणेशाहीच चालते. परंतु भाजप कार्यकर्त्यांचा विचार करणारा पक्ष असून त्याचे असंख्य उदाहरण आपल्या समोर आहेत, असेही ते म्हणाले. या सोहळ्यात पद्मसिंह राजपूत, ओंकार वालतुरे, प्रशांत कुलकर्णी, वीरेंद्र राजपूत, चेतन राठोड, अभिजीत थोरे, हर्ष खणसे, ज्ञानेश्वर पत्त्यावर, कैलास कदम, इंदलसिंह राजपूत, विठ्ठल सिंह सुलाने, स्वरुपचंद बाखला, ओम राजपूत, जगतसिंह परिहार, दत्ताभाऊ घुगे, महाजन चुंगडे यांच्यासह अनेकांनी पक्ष प्रवेश केला. या कार्यक्रमात भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.