Chhatrapati Sambhajinagar Crime : पिस्टल कसे चालते दाखव म्हणताच सुटली गोळी

एकजण गंभीर जखमी, समृद्धी महामार्गावरील सावंगी टोल नाका येथील घटना
Chhatrapati Sambhajinagar Crime
Chhatrapati Sambhajinagar Crime : पिस्टल कसे चालते दाखव म्हणताच सुटली गोळीFile Photo
Published on
Updated on

One injured after gunshot goes off

फुलंब्री, पुढारी वृत्तसेवा :

महामार्गावरील सावंगी टोल नाक्याच्या परिसरामध्ये काम करणाऱ्या एका मित्राकडे पिस्टल असल्याने ते कसे चालते हे दाखवत असताना अचानक पिस्टलमधून गोळी सुटून समोरच असणाऱ्या दुसऱ्या मित्राच्या कमरेच्या परिसरात गोळी घुसली. त्यामुळे भरत घाटगे हा गंभीर जखमी झाला. तर दुसरा पिस्टल असणारा मित्र करण भालेराव पिस्टल घेऊन फरार झाल्याची घटना शुक्रवारी (दिवस. ११) रात्री घडली आहे. याबाबत शनिवारी (दि.१२) पहाटे अडीच वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Chhatrapati Sambhajinagar Crime
Sanjay Shirsat | 'पैशांची चिंता नाही, एखादी बॅग तुम्हाला पाठवून देऊ'; पैशांच्या बॅगवरून संजय शिरसाट यांचं मिश्किल वक्तव्य

समृद्धी महामार्गावरील सावंगी परिसरामध्ये टोल प्लाझा क्र- १६ वर भरत घाटगे व करण भालेराव हे दोघे कर्मचारी ड्युटीवर होते. आलेल्या वाहनांना पास करण्याची जबाबदारी त्यांच्यावर होती. मात्र रूम मध्ये असताना सदरील पिस्टल कसे चालते याचे कुतूहल होते. करण भालेराव हा भरत घाटगे याला पिस्टल कसे असते आणि ते कसे चालते हे दाखवत होता. मात्र त्याच वेळी अचानक पिस्टलमधून गोळी सुटल्याने ती थेट जवळच असलेला भरत घाटगे या कर्मचाऱ्याच्या कमरेच्या भागात घुसली. सुदैवाने कंबर आणि पोटामध्ये घुसल्याने पोटातील आतड्यांना इजा झाली नाही. तर पिस्टल सोबत बाळगणारा करण भालेराव हा फरार झाला. सदरील घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. भरत घाटगे याला छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेची पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

रात्री दीड वाजेच्या सुमारास शस्त्रक्रिया

समृद्धी महामार्गावर सावंगी टोलनाक्याच्या परिसरात दोन कर्मचारी मित्र काम करत होते. तेथेच असलेल्या रूमवर बसलेले असताना पिस्टल कसे चालते दाखविताना अचानक गोळी सुटल्याने भरत घाटगे गंभीर जखमी झाला. रात्री दीड वाजेच्या सुमारास शस्त्रक्रिया करून सदरील गोळी बाहेर काढण्यात आली असल्याची माहिती पोलिसांनी दिली.मित्राला पिस्टल दाखविताना अचानक गोळी सुटल्याने भरत घाटगे हा गंभीर जखमी झाला. तर दुसरा करण भालेराव फरार आहे. त्याच्या मागावर पोलिस आहे. त्यामुळे या दुसऱ्या कर्मचाऱ्याकडे पिस्टल आले कुठून हा शोध घेणे सुरू आहे.

Chhatrapati Sambhajinagar Crime
Chhatrapati Sambhajinagar Crime | बांबू, बेल्टने बेदम मारहाण करून खून ; अंबेलोहळ शिवारात आढळला तरुणाचा अर्धनग्न मृतदेह
मित्राला पिस्टल दाखविताना अचानक गोळी सुटल्याने भरत घाटगे हा गंभीर जखमी झाला. तर दुसरा करण भालेराव फरार आहे. त्याच्या मागावर पोलिस आहे. त्यामुळे या दुसऱ्या कर्मचाऱ्याकडे पिस्टल आले कुठून हा शोध घेणे सुरू आहे.
- संजय सहाणे, पोलिस निरीक्षक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news