Sanjay Shirsat | 'पैशांची चिंता नाही, एखादी बॅग तुम्हाला पाठवून देऊ'; पैशांच्या बॅगवरून संजय शिरसाट यांचं मिश्किल वक्तव्य

मला बदनाम करण्यासाठी मॉर्फ व्हिडिओचा वापर केला असल्याचे शिरसाट यांनी म्हटलंय
Sanjay Shirsat
Sanjay Shirsat(File Photo)
Published on
Updated on

Sanjay Shirsat News

छत्रपती संभाजीनगर : शिंदेंच्या शिवसेनेचे नेते आणि सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांचा पैशांनी भरलेल्या बॅग सोबतचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर खळबळ उडाली. हा व्हिडिओ मला कुणीतरी पाठवला असल्याचा दावा ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला. यावर संजय शिरसाट यांनी संजय राऊत यांच्यावर हल्लाबोल केला. दरम्यान, पैशांच्या बॅगवरुन संजय शिरसाट यांचे एक मिश्किल वक्तव्य चर्चेत आले आहे. ''पैशांची चिंता करू नका. पैशांसाठी काही अडलं नाही, पैसे देणारे आम्हीच आहोत. एखादी बॅग तुम्हाला पाठवून देऊ,'' असे वक्तव्य संजय शिरसाट यांनी छत्रपती संभाजीनगरमधील कॅन्सर हॉस्पिटलमधील कार्यक्रमात बोलताना केले आहे. पैशाची चिंता नाही. पेशंट मात्र येथून हसत गेला पाहिजे, असेही ते पुढे हसत हसत म्हणाले.

'मी अब्रू नुकसानीचा दावा दाखल करणार'

दरम्यान, त्याआधी मंत्री संजय शिरसाट यांनी पैशांनी भरलेल्या बॅग सोबतचा व्हिडिओवर मोठा खुलासा केला. मला बदनाम करण्यासाठी मॉर्फ व्हिडिओचा वापर केला असल्याचे त्यांनी म्हटले आहे. 'त्यांना धडा शिकवायला हवा. मी अब्रू नुकसानीचा दावा दाखल करणार आहे. माफी मागितली नाही तर मी गुन्हा दाखल करणार आहे,'' असा इशारा शिरसाट यांनी दिला.

Sanjay Shirsat
Anjali Damania On sanjay Shirsat : माझ्यावर मानहानीचा दावा करा : अंजली दमानियांचे मंत्री शिरसाटांना थेट आव्हान

मी आज नोटीस पाठवणार आहे. जर उत्तर दिलं नाही तर फौजदारी तक्रार दाखल करून गुन्हा दाखल करणार आहे. त्यांना मान नाही. त्यांची लायकी नाही. रोज सकाळी भोंगा सुरु आहे. महाराष्ट्रमध्ये यांची गँग कार्यरत आहे. यांच्या सरकारी बंगल्यातील पार्ट्या काढाव्या लागतील. हे सगळे टार्गेट करण्याचा प्रयत्न आहे. कुठला तरी व्हिडिओ काढला आणि तो माझा म्हणता, लाजलज्जा वाटते का? अशा शब्दांत त्यांनी संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला.

एकनाथ शिंदे नाराज आहेत का?

संजय गायकवाड असो वा मी, आमच्यावर शिंदे साहेब नाराज नाहीत. आम्ही चूक करत नाही. अपेक्षित काम करतो, असाही दावा त्यांनी केला आहे.

'आता जयंत पाटील यांची घुसमट थांबली'

जयंत पाटील यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याच्या घडामोडीवर शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली आहे. '' ते अस्वस्थ होते, आता जयंत पाटील यांची घुसमट थांबली असेल,'' असे शिरसाट यांनी म्हटले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news