Census News : ओबीसी प्रवर्गाची जातनिहाय जनगणनेची मागणी

सध्या राज्यासह देशात राष्ट्रीय जनगणनेचे काम सुरू आहे.
Census  News
Census News : ओबीसी प्रवर्गाची जातनिहाय जनगणनेची मागणीfile photo
Published on
Updated on

OBC Category Demands Caste-based Census

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : ओबीसी प्रवर्गाची जातनिहाय जनगणना आणि खुल्या प्रवर्गातील जागेवर राखीव उमेदवारांना संधी नाकारणारा घटनाबाह्य निर्णय रद्द करण्यात यावा, अशी मागणी ओबीसी भटके-विमुक्त महासंघ मराठवाडा विभागाच्या वतीने करण्यात आली आहे.

Census  News
Sambhajinagar water supply : शहराची २० वर्षांची प्रतीक्षा संपली

सध्या राज्यासह देशात राष्ट्रीय जनगणनेचे काम सुरू आहे. जनगण-नेच्या सर्वेक्षणात ओबीसी प्रवर्गाच्या जातनिहाय जनगणनेबाबत कुठलाही प्रश्न किंवा कॉलम उपलब्ध नाही. त्यामुळे ओबीसी प्रवर्गामध्ये असंतोष असून, ओबीसीची जातनिहाय जन-गणना होण्याबाबत कार्यवाही करण्यात यावी.

तसेच गुरुवारी झालेल्या महाराष्ट्र मंत्रिमंडळाच्या बैठकीत आरक्षित जातीच्या उमेदवारांना खुल्या जागेवर दावा करता येणार नसल्याबाबतचा घटनाबाह्य मंत्रिमंडळाचा निर्णय त्वरित मागे घेण्यात यावा. या दोन मागण्यांसाठी ओबीसी भटके-विमुक्त महासंघाच्या मराठवाडा विभागाच्या वतीने मुख्यमंत्री, यांना विभागीय आयुक्त यांच्यामार्फत तीव्र भावना निवेदन स्वरूपात पाठवण्यात आल्या आहेत.

Census  News
Bharat Gogawale : खरातचे प्रकरण हाताबाहेर, चौकशीत सर्व निष्पन्न होईल

याचा योग्य विचार करण्यात यावा अन्यथा पुढील काळात आंदोलनाच्या माध्यमातून रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही, असेही त्यात म्हटले आहे. यावर रामप्रसाद थोरात, डॉ. किशोर त्रिभुवन, महेश निवाडे, सुभाष जाधव, खुशालराव बनसोडे, अंजन साळवे नावे आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news