Chhatrapati Sambhajinagar Crime : कुख्यात ड्रग्स माफिया आदिल चाऊसला बेड्या

१५ दिवसांपूर्वीच जेलमधून आला होता बाहेर, १४ ग्रॅम एमडी जप्त; एनडीपीएस पथकाची कारवाई
Crime News
Crime Newspudhari photo
Published on
Updated on

छत्रपती संभाजीनगर : अवघ्या १५ दिवसांपूर्वी कारागृहाच्या बाहेर आलेल्या कुख्यात ड्रग्स माफिया आदिल चाऊस अहमद चाऊस (३६, रा. प्लॉट नं. २४, नवाब मस्जिदजवळ, सईदा कॉलनी) याने पुन्हा अमली पदार्थ विक्रीचा गोरखधंदा सुरू केल्याचे समोर आले आहे.

एनडीपीएसच्या पथकाने त्याच्या घरावर छापा मारून बेड्या ठोकल्या. कारवाईत २ लाख ४० हजार रुपये किमतीचे १२ ग्रॅम एमडी पावडर जप्त करण्यात आले. आदिल शहरातील 'टॉप-२०' अंमली पदार्थ तस्करांच्या यादीतील दोन नंबरचा गुन्हेगार आहे.

Crime News
FDA raid Chhatrapati Sambhajinagar : अमोल अन् लक्ष्मी डेअरीवर 'एफडीए'ची धाड

एनडीपीएस पथकाचे उपनिरीक्षक उत्रेश्वर मुंडे यांना सईदा कॉलनीत एमडी ड्रग्स विक्री होत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून आदिल चाऊस याला ताब्यात घेतले.

सहायक निरीक्षक सचिन सदाफुले यांच्या उपस्थितीत त्याची झडती घेतली असता, त्याच्या पँटच्या खिशात आणि त्याने घातलेल्या जॅकेटमध्ये १९ प्लास्टिकच्या पिशव्या आढळून आल्या. या पिशव्यांमध्ये १२ ग्रॅम एमडी पावडर मिळून आली. फॉरेन्सिक तज्ज्ञांनी जागेवरच तपासणी करून ती मेफेड्रोन पावडर असल्याचे निष्पन्न केले. त्याला अटक करून बेगमपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

Crime News
Jayakwadi water level : जायकवाडी धरणात ७५ टक्के पाणीसाठा

ही कारवाई पोलिस निरीक्षक गजानन कल्याणकर यांच्या मार्गदर्शनात सहायक आयुक्त सचिन सदाफुले, उपनि उत्रेश्वर मुंडे, हवालदार भाऊसाहेब चव्हाण, नारायण पायघन, सतीश जाधव, छाया लांडगे, देशराज मोरे, सरताज पठाण, विशाल मेटे आणि विठ्ठल पवार यांनी केली.

टॉप २० मधील नंबर दोनचा गुन्हेगार

आरोपी आदिल चाऊस हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी तब्बल २४ गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्यातील सर्वाधिक ड्रग्स तस्करीचे अहित. त्याच्या गुन्हेगारी कारवायांमुळे याआधी मोक्का कायद्यांतर्गतही कारवाई केली होती. मात्र, त्यानंतर त्याने ड्रग्सचा धंदा सुरू केल्याने सिटी चौक पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यात तो जेलमध्ये होता. पंधरा दिवसांपूर्वी १५ जुलैला तो जेलच्या बाहेर आला आणि पुनः धंदा सुरू केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news