FDA raid Chhatrapati Sambhajinagar : अमोल अन् लक्ष्मी डेअरीवर 'एफडीए'ची धाड

सोयाबीन तेलापासून बनावट तूप अन् पनीरचे उत्पादनासह विक्री, तब्बल ३ लाखांहून अधिकचा भेसळयुक्त साठा जप्त
FDA raid Chhatrapati Sambhajinagar
एफडीएने जप्त केलेला भेसळयुक्त तेलाचा साठा.pudhari photo
Published on
Updated on

छत्रपती संभाजीनगर : सोयाबीन तेलापासून कृत्रिम पनीर आणि तूप बनवून ग्राहकांच्या जीवाचा खेळ मांडणाऱ्या चिकलठाणा येथील अमोल दूध डेअरीवर छापा टाकत एफडीए पथकाने तब्बल ३ लाख १२ हजारांहून अधिक किमतीचा भेसळयुक्त तेलाचा साठा जप्त केला आहे. तर याच बनावट पनीर अन् तुपाची विक्री करणाऱ्या लक्ष्मी डेअरीच्या तिन्ही शाखांवरून संशयित तुपाचा साठा जप्त करत त्यांचे परवाने रद्द करण्याचा दणका दिला आहे.

'सुरक्षित अन्न सुरक्षित महाराष्ट' या मोहिमेंतर्गत अन्न प्रशासनाकडून एमआयडीसी चिकलठाणा येथील दामोदर केदार याच्या मालकीची अमोल दूध डेअरीवर गुरुवारी केलेल्या तपासणी दरम्यान सोयाबीन तेलाचे १० ते १२ अखाद्य दर्जाचे (मानवी वापरासाठी अयोग्य) पिंप आढळले. या अखाद्य तेलाचा वापर करून कृत्रिम पनीर तसेच शुद्ध गाईचे तूप बनवले जात असल्याचे उघड झाले.

FDA raid Chhatrapati Sambhajinagar
Mahavikas Aghadi Satara : बिजवडी सोसायटीत महाविकास आघाडीला धक्का

प्रशासनाने घटनास्थळावरून अखाद्य सोयाबीन तेल, भेसळयुक्त तूप, मलाई आणि बनावट पनीरचा साठा जप्त केला आहे. नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या या गंभीर प्रकाराची दखल घेत अन्न प्रशासनाकडून या डेअरीचा उत्पादन परवाना तत्काळ निलंबित करण्यात आला असून, हे उत्पादन केंद्र पूर्णपणे बंद करण्यात आले आहे.

सह आयुक्त श्रीकांत करकळे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सहायक आयुक्त दयानंद पाटील यांच्या नेतृत्वाखाली अन्न सुरक्षा अधिकारी वर्षा रोडे, कीर्तिका झाडे, प्रज्ञा सुरसे, फरीद सिद्धिकी, योगेश चिभादे यांनी ही धडक कारवाई केली.

FDA raid Chhatrapati Sambhajinagar
Sambhajinagar ST buses : मुसळधार पावसामुळे अनेक मार्गावरील बसफेऱ्या रद्द

'लक्ष्मी डेअरी'च्या ३ विक्री केंद्राचे परवाने रद्द

अमोल दूध डेअरीकडून भेसळयुक्त पनीर व गाईच्या तुपाचा पुरवठा शहरातील 'लक्ष्मी डेअरी'च्या टीव्ही सेंटर परिसर, कामगार चौक आणि दर्गा रोड श्रीराम चौक या तीन विक्री केंद्रांना केला जात होता. अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांच्या पथकाने या तिन्ही ठिकाणी एकाच वेळी धाड टाकत ४१ किलो गाईचे तूप (किंमत २९,३००/-) जप्त केले. या तिन्ही केंदांचे परवानेही रद्द करण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news