

Notorious criminal fatally attacks siblings with cutter
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा हॉटेलमध्ये י जेवण करण्यासाठी गेल्यानंतर भावंडानी पार्किंगमध्ये गाडी लावताना बाजूला सरका, असे म्हटल्यावरून खुनाच्या गुन्ह्यातील कुख्यात आरोपी सौरभ वानखेडेसह तिघांनी त्यांच्यावर जीवघेणा हल्ला चढवला. एकाच्या गळ्यावर कटरने वार करून जिवे मारण्याच्या प्रयत्न केला.
ही घटना सोमवारी (दि.२३) रात्री साडेआठच्या सुमारास एन १ भागातील हॉटेल एका हॉटेल समोर घडली. दरम्यान एमआयडीसी सिडको पोलिसांनी मुख्य आरोपी सौरभ नानासाहेब वानखेडे (२८, रा. अयोध्यानगर, एन-७) याला अटक केल्याची माहिती पोलिस निरीक्षक गजानन कल्याणकर यांनी बुधवारी (दि. २५) दिली.
सौरभ वानखेडे हा सिडको भागातील एका गाजलेल्या खून प्रकरणातील आरोपी आहे. तसेच त्याच्याविरुद्ध अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हेही नोंद असल्याचे पोलिसांनी सांगितले.
फिर्यादी महेश किशोर वैष्णव (२५, रा. न्यू हनुमाननगर) हा त्याचा चुलत भाऊ दुर्गेशसोबत सिडको भागातील एका हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी गेला होता. पार्किंगमध्ये गाडी लावत असताना दुर्गेशने तेथे उभ्या अनोळखी तिघांना बाजूला सरका आम्हाला गाडी लावू द्या असे म्हटले. त्यावरुन आरोपींनी दोघांना शिवीगाळ करून बेदम मारहाण सुरु केली.
एका आरोपीने तुम्हाला जीवे मारून टाकतो असे म्हणत महेशच्या गळ्यावर कटरने जीवघेणा वार केला. महेशने हात मध्ये घातल्याने हाताला जखम झाली. यानंतर पुन्हा आरोपीने पवार, पाठीवर वार करून जखमी केले. याप्रकरणी एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर पोलिसांनी सौरभला अटक केली.