CIDCO : सिडकोचे महानगर विकास प्राधिकरणाकडे हस्तांतरण

वाळूज महानगरातील प्रकल्पांचा समावेश
CIDCO News
CIDCO : सिडकोचे महानगर विकास प्राधिकरणाकडे हस्तांतरणFile Photo
Published on
Updated on

Transfer of CIDCO to Metropolitan Development Authority

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : वाळूज महानगरातील सिडकोच्या प्रकल्पांचे छत्रपती संभाजीनगर महानगर विकास प्राधिकरणाकडे हस्तांतरण करण्याचा निर्णय शासनाकडून मंगळव-ारी (दि. २४) जारी करण्यात आला आहे. मात्र या क्षेत्रातील अनेक कामे प्रलंबित असून, यानिर्णयाविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात येणार असल्याचे नागरी कृती समितीच्यावतीने सांगण्यात आले आहे.

CIDCO News
Chhatrapati Sambhajinagar : महिला उपकुलसचिवांनी डोक्यावर वाहिले कार्यालयीन दप्तर

वाळूज महानगरातील घाणेगाव, कमलापूर, इटावा, राजंणगाव शेणपुजी, जोगेश्वरी, सहजापूर, रामराई, वाळूज, वडगाव कोल्हाटी या भागातील सिडको अंतर्गत येणारे क्षेत्र महानगर विकास प्राधिकरणाकडे हस्तांतरित करण्याचा शासन निर्णय मंगळवारी जारी करण्यात आला आहे. त्यामुळे या क्षेत्राचे महार-ाष्ट्र औद्योगिक महामंडाळत्तचे विशेष नियोजन कार्य संपुष्टात आले आहे.

दरम्यान सिडको वाळूजमहानगर बचाव कृती समितीने सिडको वाळूजमहानगरचा संपूर्ण विकास झाल्यानंतरच हस्तांतरण करण्यात यावे, अशी याचिका २०२१ साली औरंगाबाद खंडपीठात दाखल करण्यात आली होती. न्यायालयाच्या आदेशानंतर सिडकोकडून दोनशे कॉटीची कामे सुरू करण्यात आली आहेत.

CIDCO News
Sambhajinagar Encroachment Removal Campaign : सामान्यांवर घाव, बड्यांना अभय

मात्र, अजूनही अनेक कामे प्रलंबित असल्याची माहिती बचाव कृती समितीचे अध्यक्ष नागेश कुठारे यांनी दिली. तसेच या निर्णयाविरोधात पुन्हा उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात येणार असल्याचे कुठारे यांनी सांगितले. अनेक कामे प्रलंबित असूनही शासनाने हा निर्णय घेणे म्हणजे वाळूजमहानगरवासीयांची एक प्रकारे फसवणूक असून यानिर्णयाविरोधात जन अंदोलन उभारण्यात येईल, असे सिडको वाळूजमहानगर बचाव कृती समितीचे अध्यक्ष नागेश कुठारे यांनी सांगितले.

चार कर्मचाऱ्यांवर भार वाळूज महानगरातील सिडकोच्या प्रकल्पांचे महानगर विकास प्राधिकरणाकडे हस्तातरणांचा निर्णय शासनाने जारी केला. मात्र, महानगर विकास प्राधिकरणाकडे पुरेसे मनुष्यबळ नाही. या विभागाचा कार्यभार चार कर्मचाऱ्यांवर असून, हस्तांतरण हस्तांत करण्यात आलेल्या वाळूज महानगर सिडकोचा भार या विभागाला सोसावणार का, असा प्रश्न बचाव कृती समितीकडून करण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news