NEET student death: NEET परीक्षेत कमी गुण; नैराश्यातून १९ वर्षीय विद्यार्थ्याने जीवन संपवले

वैजापूर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास पोलिस करीत आहेत
NEET student death
NEET student death
Published on
Updated on

वैजापूर : तालुक्यातील खंडाळा येथे नीट परीक्षेची तयारी करणाऱ्या १९ वर्षीय विद्यार्थ्याने गळफास घेऊन जीवन संपवल्याची दुर्दैवी घटना बुधवारी (दि.१९) घडली. सूरज सुभाष शिंदे असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. नीट परीक्षेत अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळाल्याने आलेल्या नैराश्यातून त्याने हे पाऊल उचलल्याचे प्राथमिक पोलिस तपासात समोर आले आहे.

NEET student death
Karjat NEET Student: ‘नीट’मध्ये अपेक्षित गुण न मिळाल्याने डॉक्टर होण्याचे स्वप्न भंगले; कर्जतमध्ये १९ वर्षीय विद्यार्थिनीने संपविले जीवन

सूरज हा घरीच नीट परीक्षेची तयारी करीत होता. जीवन संपवण्यापूर्वी त्याने दोन ओळींची चिठ्ठी लिहून ठेवली होती. त्यामध्ये, ‘सॉरी, आई आणि अप्पा, नक्कीच पुढच्या जन्मी तुमच्यासाठी डॉक्टर बनेल. काळजी घ्या आणि आनंदी राहा,’ असा मजकूर असल्याचे पोलिसांनी सांगितले.

NEET student death
Pune NEET Student: NEET निकालानंतर पुण्यात विद्यार्थिनीने संपविले जीवन; कारण अद्याप अस्पष्ट

गावात सप्ताह सुरू असल्याने घटनेच्यावेळी कुटुंबातील सदस्य घराबाहेर गेले होते. बुधवारी दुपारी दोनच्या सुमारास कुटुंबीय घरी परतल्यानंतर त्यांनी सूरजला फोन केला. मात्र, त्याचा फोन बंद असल्याचे आढळले. त्यानंतर त्याच्या लहान बहिणीने वरच्या खोलीत जाऊन पाहिले असता सूरज गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. तिच्या आरडाओरडीनंतर कुटुंबीयांनी तातडीने धाव घेतली.

NEET student death
Parbhani Student: 550 गुण मिळूनही संपवलं आयुष्य; परीक्षा रद्द झाल्यामुळे परभणीत NEET विद्यार्थ्याने उचललं टोकाचं पाऊल

सूरजला तातडीने वैजापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले. शोकाकुल वातावरणात त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या प्रकरणी वैजापूर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास पोलिस करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news