Parbhani Student: 550 गुण मिळूनही संपवलं आयुष्य; परीक्षा रद्द झाल्यामुळे परभणीत NEET विद्यार्थ्याने उचललं टोकाचं पाऊल

Parbhani NEET Student: गंगाखेड तालुक्यातील ढवळकेवाडी तांड्यातील 19 वर्षीय प्रथमेश राठोड याने विषारी औषध प्राशन केल्याची घटना समोर आली आहे.
Parbhani NEET Student
Parbhani NEET StudentPudhari
Published on
Updated on

Parbhani NEET Student: परभणी जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. NEET परीक्षा दिलेल्या 19 वर्षीय विद्यार्थ्याने विषारी औषध प्राशन करून जीवन संपवल्याची घटना गंगाखेड तालुक्यात घडली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून स्पर्धा परीक्षांमधील ताणतणावाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.

प्रथमेश राठोड असे विद्यार्थ्याचे नाव असून तो गंगाखेड तालुक्यातील ढवळकेवाडी तांडा येथील रहिवासी होता. मिळालेल्या माहितीनुसार, प्रथमेशने नुकतीच NEET परीक्षा दिली होती आणि त्याला सुमारे 550 गुण मिळाले होते. मात्र, परीक्षा प्रक्रियेतील गोंधळ आणि पेपर रद्द झाल्याच्या चर्चेमुळे तो काही दिवसांपासून मानसिक तणावात असल्याचे सांगितले जात आहे.

कुटुंबीयांच्या माहितीनुसार, अभ्यासाचा ताण आणि भविष्यासंदर्भातील चिंता यामुळे प्रथमेश अस्वस्थ होता. याच तणावातून त्याने विषारी औषध प्राशन केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.

Parbhani NEET Student
RBI New Rules 2026: Loan, ATM, UPI वापरताय? RBI चे नवे नियम माहित नसतील तर होऊ शकतं नुकसान

घटना लक्षात येताच कुटुंबीयांनी त्याला तातडीने गंगाखेड उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीनंतर त्याला मृत घोषित केले. या घटनेने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात शोककळा पसरली आहे.

दरम्यान, या प्रकरणाची नोंद गंगाखेड पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. आत्महत्येमागचे नेमके कारण काय होते, याचा तपासही केला जात आहे.

Parbhani NEET Student
Meta Subscription Plans: Meta चा मोठा निर्णय! आता Instagram, Facebook आणि WhatsApp साठी पैसे द्यावे लागणार? काय आहे प्लॅन?

देशभरात NEET परीक्षा, पेपर लीक, परीक्षा प्रक्रियेतील अनिश्चितता आणि स्पर्धात्मक ताण यामुळे अनेक विद्यार्थी मानसिक दबावाखाली असल्याच्या घटना समोर येत आहेत. तज्ज्ञांच्या मते, केवळ गुण किंवा परीक्षेचा निकाल हा आयुष्याचा शेवट नसतो. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी मानसिक आरोग्याबाबत अधिक संवेदनशील राहणे आवश्यक आहे.

जर तुम्ही किंवा तुमच्या ओळखीतील कोणी मानसिक तणावातून जात असेल, तर मदत मागणे अत्यंत महत्त्वाचे आहे. सरकारच्या हेल्पलाइन 1800-233-3330 वर संपर्क साधता येतो. तसेच मित्र, कुटुंबीय किंवा विश्वासू व्यक्तींशी मन मोकळं करणंही महत्त्वाचं ठरू शकतं.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news