Crime News : मायेचा काळाकुट्ट चेहरा! नव्या संसारासाठी लेकराचा बळी

सावंगी बायपास परिसरातील ५ वर्षीय गतिमंद बालकाच्या हत्येचे गूढ उकलले; गुन्हे शाखेने ५०० किमी पाठलाग करत दोघांना ठोकल्या बेड्या
Crime News
Crime News : मायेचा काळाकुट्ट चेहरा! नव्या संसारासाठी लेकराचा बळीfile photo
Published on
Updated on

Murder of 5-Year-Old Mentally Challenged Child in Sawangi Bypass Area Solved

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : नव्या पतीसोबत संसार थाटण्यासाठी एका जन्मदात्या आईनेच आपल्या पाच वर्षांच्या निरागस, गतिमंद मुलाचा जीव घेतला. हर्मूल सावंगी बायपासजवळ आढळलेला मृतदेह ओमकार नावाच्या बालकाचा असून, सावत्र बापानेच त्याचा गळा घोटून खून केल्याचे तपासात समोर आले आहे. सावत्र बाप मुलाला मारहाण करून त्याचा गळा घोटत असताना आईने त्याला वाचवण्याऐ वजी मारण्यासाठी साथ दिल्याचेही तपासात उघड झाले आहे.

Crime News
Sambhajinagar Crime : जन्मदाताच झाला वैरी; पाच वर्षाच्या गतिमंद चिमुकल्याची हत्या

याप्रकरणी शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेने रातोरात ५०० किलोमीटरचा थरारक पाठलाग करत अखेर आरोपी माता-पित्यांना देऊळगाव राजा येथून बेड्या ठोकल्या. संतोष सोनाजी ढाळे (रा. मोप, ता. रिसोड, जि. वाशीम) आणि पूजा राजू पाडेवाड (रा. सगरोळी जवळ, ता. बिलोली, जि. नांदेड, सध्या दोघेही रा. सावित्रीनगर, चिकलठाणा) अशी आरोपींची नावे असल्याची माहिती पोलिस निरीक्षक गजानन कल्याणकर यांनी दिली.

अधिक माहितीनुसार, केंब्रिज ते सावंगी बायपास रस्त्यालगत मंगळव ारी (दि.१९) सकाळी शेतात या विशेष बालकाचा मृतदेह सापडल्यानंतर खळबळ उडाली होती. पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी गुन्हे शाखेचे निरीक्षक गजानन कल्याणकर यांना आरोपींचा शोध घेण्याचे आदेश दिले होते.

Crime News
Robbery Case : शहरात भुरट्या चोरांचा सुळसुळाट; घरफोडी, लुटमारीच्या चार घटना

गुन्हे शाखेच्या पथकाने रातोरात रिसोड, वाशिम आणि अकोला असा प्रवास करत आरोपींच्या नातेवाइकांना गाठले. त्यांच्याकडे चौकशी सुरू असतानाच आरोपीचा एका नातेवाइकाला फोन आला आणि ते देऊळगाव राजा येथे असल्याचे निष्पन्न झाले. या माहितीच्या आधारे देऊळगाव राजाचे पोलिस निरीक्षक ब्रह्मा गिरी यांच्या मदतीने दोन्ही आर- ोपींना ताब्यात घेतले.

ही कारवाई पोलिस आयुक्त प्रवीण पवार, उपायुक्त (गुन्हे) रत्नाकर नवले यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक गजानन कल्याणकर, उपनिरीक्षक प्रवीण वाघ, हवालदार विजय निकम, राजेश यदमळ, जालिंदर गोरे, राहुल बंगाळे, माया माळी आणि संतोष चौरे यांच्या पथकाने केली.

पहिल्या पतीचा मृत्यू अन् दुसरा संसार

आरोपी पूजा हिचे पहिले लग्न नांदेड जिल्ह्यातील संदीप पाडेवाड याच्याशी झाले होते. त्यांना एक १० वर्षांची मुलगी आणि ५ वर्षांचा गतिमंद ओमकार अशी दोन मुले होती. मात्र दारूच्या व्यसनामुळे पाच वर्षांपूर्वी संदीपचा मृत्यू झाला. त्यानंतर पूजाने मुलीला सासूकडे सोडले आणि ती ओमकारला घेऊन मजुरीसाठी जालन्याला आली. चार महिन्यांपूर्वी तिची ओळख संतोष ढाळेसोबत झाली. ओळखीचे रूपांतर प्रेमात झाल्यानंतर त्यांनी शिर्डीत जाऊन लग्न केले आणि महिनाभरापूर्वी ते चिकलठाणा भागातील सावित्रीनगर येथे भाड्याची खोली घेऊन राहू लागले.

मृतदेहावर आईनेच झाकली ओढणी

आरोपी संतोष आरोपी पूजा ढाळे पाडेवाड सोमवारी (दि.१८) रात्री ८ वाजेच्या सुमारास संतोष दारूच्या नशेत तर्रर होऊन घरी आला. त्यावेळी ओमकार गाढ झोपलेला होता. संतोषने ओमकारला जोरात लाथा मारल्या आणि उचलून जमिनीवर आपटले. एवढ्यावरच न थांबता त्याने त्याचा गळा आवळला. श्वास कोंडल्याने ओमकार जागीच बेशुद्ध पडून गतप्राण झाला. यावेळी घरात उपस्थित असलेल्या पूजाच्या मातृत्वाला पाझर फुटला नाही. तिने मुलाला वाचवण्याऐवजी स्वतःच्या ओढणीने त्याला झाकले. त्यानंतर संतोषने ओमकारचा मृतदेह खांद्यावर टाकून घरापासून ५०० मीटर अंतरावर सावंगी बायपासजवळील शेतात नेऊन फेकून दिला. मात्र पोलिसांच्या तपासातून हे पाप लपून राहिले नाही आणि २४ तासांतच या नराधम माता-पित्यांचा खरा चेहरा समाजासमोर आला.

दिव्यांग ओमकार ठरला अडसर

पूजा आणि संतोष यांच्या नव्या संसारात पूजाचा पहिल्या पतीपासूनचा ५ वर्षीय गतिमंद ओमकार हा अडसर ठरू लागला होता. मुलगा गतिमंद असल्याने त्याची देखभाल करणे या दोघांनाही नकोसे झाले होते. यातूनच संतोष ओंकारला सतत दारू पिऊन मारहाण करत असे. याच तिरस्कारातून त्यांनी ओमकारला मारून दुसऱ्या शहरात जाऊन राहण्याचा कट रचला होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news